Five people appointed as advisers on Adinath Will help to get out of trouble

करमाळा (अशोक मुरूमकर) : श्री आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या यंत्रणेवरून बारामती ऍग्रोचे उपाध्यक्ष सुभाष गुळवे यांनी मंत्री तानाजी सावंत यांच्यावर निशाणा साधताच या कारखान्यावर तालुक्यातील पाच जणांची सल्लागारपदी नियुक्ती करण्यात आली आहे. मात्र सल्लागार नेमल्याने आदिनाथच्या अडचणी सुटतील का? अशी चर्चा तालुक्यात सुरु झाली आहे. (Five people appointed as advisers on Adinath Will help to get out of trouble)

श्री आदिनाथ सहकारी साखर कारखाना बारामती ऍग्रोकडे जाणार होता. मात्र ऐनवेळी सरकार बदल झाल्याने मंत्री सावंत यांच्या पुढाकाराने हा कारखाना भाडेतत्वावर जाऊ शकला नाही. हा कारखाना अडचणीतून काढण्यासाठी प्रयत्न सुरु असतानाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते गेल्यावर्षी मोळी टाकण्यात आली. त्यानंतर हा कारखाना सुरळीत होईल, अशी शक्यता होती. मात्र यावर्षी यंत्रणेचा अभाव झाल्याने गाळपावर परिणाम झाला आहे. प्रशासकीय संचालक मंडळाचे सदस्य शिवसेनेचे जिल्हा प्रमुख महेश चिवटे यांचा प्रयत्न हा कारखाना सुरळीत करण्यासाठी आहे. मात्र त्याला प्रतिसाद मिळत नसल्याचे दिसत आहे.

आरोग्य मंत्री सावंत यांना आदिनाथ स्वतः च्याच ताब्यात घ्यायचा आहे त्यासाठीच ते आदिनाथ कारखाना जास्तीत जास्त कसा अडचणीत येईल याचा प्रयत्न करत आहेत, असे आरोप बारामती एॅग्रोचे उपाध्यक्ष गुळवे यांनी केला होता. श्री आदिनाथ सहकारी साखर कारखाना बारामती एॅग्रोने भाडेतत्त्वावर घेतलेला असताना जाणीवपूर्वक राजकारण करून हा कारखाना बारामती ऍग्रोला देण्यास विरोध केला. आज हा कारखाना किती क्षमतेने चालतो? असा प्रश्न करतानाच त्यांनी आदिनाथ कारखाना वाचवायचा असेल तर सावंतांनी स्वतःच्या कारखान्याची यंत्रणा पुरवली पाहिजे, असे म्हटले होते.

‘सावंतांनी आदिनाथवर प्रशासक आणून प्रशासकांना आपल्या इशारा वरती नाचवण्याचे काम करत आहेत. प्रशासक म्हणून नेमण्यात आलेले शिवसेना जिल्हाप्रमुख महेश चिवटे हे कारखाना सावंतांच्या घशात कसा घालता येईल? यासाठी ते सर्व वातावरण निर्मिती करत आहेत, असाही आरोप केला होता. आदिनाथला यंत्रणा पुरवावी म्हणून प्रशासक नेमलेले पवारांच्या दारात फेऱ्या मारत आहेत’, असेही त्यांनी म्हटले होते.

त्यानंतर आज (गुरुवारी) श्री आदिनाथ सहकारी साखर कारखान्याचे प्रशासक मंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब बेंद्रे यांनी तालुक्यातील पाच जणांची कारखाना सल्लागार पदी नियुक्ती केली आहे. यामध्ये कोंढारचिंचोलीचे सामाजिक कार्यकर्ते सुहास गलांडे, आदिनाथ कारखान्याचे माजी कार्यकारी संचालक हरिदास डांगे, माजी आमदार नारायण पाटील गटाचे नेते धुळाभाऊ कोकरे, आदिनाथ बचाव समितीचे डॉ. वसंतराव पुंडे, केमचे अच्युत तळेकर पाटील यांची नियुक्ती झाली आहे, असे सांगितले जात आहे.

धुळाभाऊ कोकरे ‘काय सांगता’ न्यूज पोर्टलशी बोलताना म्हणाले, ‘आदिनाथ कारखाना अडचणीतून बाहेर काढणे आवश्यक आहे. कारखान्याला ऊस देण्यासाठी शेतकरी इच्छुक आहेत. मात्र यंत्रणेचा अभाव आहे. हा कारखाना चालवण्यासाठी माजी आमदार नारायण पाटील यांच्यासह जगताप व बागल गटाच्या प्रमुखांशी चर्चा केली जाणार आहे. कारखाना जेव्हा निवडणूक होईल तेव्हा हा कारखाना येथील कोणाकडे तरी जाणार आहे ही भावना डोळ्यासमोर ठेऊन काम करणे आवश्यक आहे. श्री आदिनाथ महाराजांची कृपा असल्याने हा कारखाना बंद पडणार नाही, माझ्या मागील अनुभवाचा उपयोग केला जाईल. कारखाना कसा व्यवस्थित चालेल यासाठी प्रयत्न करणार आहे. आमची निवड उशीरा झाली असली तरी कारखाना व्यवस्थित कसा चालेल यासाठी प्रामाणिक प्रयत्न करणार आहे, असे कोकरे यांनी सांगितले आहे.

शिवसेनेचे जिल्हा प्रमुख व कारखान्याचे प्रशासकीय संचालक महेश चिवटे म्हणाले, ‘कारखान्यावर सल्लागार नेमण्याबाबत ठराव करण्यात आला होता. कारखान्याचा १५० कोटींचा प्रस्ताव पाठवण्यात आला आहे. येथे प्रदर्शकपणे काम करता यावे म्हणून हे सदस्य आहेत. त्यांना संचालक मंडळाच्या बैठकीत मत मांडता येणार आहे. त्याशिवाय इतर सभासदानांही त्यांचे मत मांडता येणार आहे. कारखाना सध्या अडचणीत आहे, अशा स्थितीतही आपण गाळप करण्याचा प्रयत्न करत आहे. बारामती ऍग्रोचे उभाध्यक्ष गुळवे यांच्या आरोपावर उत्तर देण्यासाठी स्वतंत्र पत्रकार परिषद घेणार असल्याचे’ चिवटे यांनी सांगितले आहे.

By kaysangtaa.21

पुणे, मुंबई, पिंपरी चिंचवड, सोलापूर व नगर येथे ‘पुढारी’, ‘प्रभात’ व ‘सकाळ’मध्ये बातमीदार व उपसंपादक म्हणून काम करत पत्रकारितेचा अनुभव घेतल्यानंतर 'काय सांगता' हे न्यूज पोर्टल सुरु करण्यात आले आहे. या पोर्टलवरील प्रत्येक बातमी विश्वसनीय असते. करमाळा येथील बातम्यांसाठी अशोक मुरूमकर संपर्क : ९९२३१७५०२४ कार्यालय पत्ता : डॉ. बाबासाहेब आंबेडकर शॉपिंग सेंटर, गाळा नं. ४७, पेट्रोल पंपाजवळ, जुनी भाजी मंडई, वरचा मजला करमाळा, जि. सोलापूर- ४१३२०३. मेल आयडी : kaysangtaa.21@gmail.com जाहिरातीसाठी संपर्क : ९९२३१७५०२४

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *