करमाळा (सोलापूर) : तालुक्यातील गुळसडी येथील भीमराव उर्फ तात्या ननवरे यांचा शनिवारी (ता. 21) पुण्याला जात असताना एसटी बसमध्ये हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाला.
करमाळा बसस्थानक येथून सायंकाळी साडेपाच वाजताच्या पुणे एसटी बसने ते नातवंडासोबत जात होते. ही एसटी बस जात असताना कोर्टीच्या जवळ ब्रेकडाऊन झाली. दरम्यान 7.15 वाजताच्या सुमारास तेथे दुसरी बस आली. ती एसटी बस पाटसच्याजवळ आल्यानंतर प्रवासी ननवरे यांना छातीत दुखू लागले. दरम्यान हृदयविकाराचा झटका येऊन तोंडात फेस आल्याचे पाहून इतर प्रवासी घाबरून गेले. त्या एसटी बसमध्ये करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती चिंतामणी जगताप यांचे चिरंजीव पृथ्वीराज जगताप (वय 17) हे होते.
Ajitdada उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा करमाळा दौरा ठरला! मंगळवारी ‘वायसीएम’वर आगमन झरे फाट्यावर मेळावा
जगताप यांनी ननवरे यांना एसटी बसमध्ये झोपवून छातीवर पंपीग केले. त्यानंतर त्यांना एका रुग्णालयात दाखल केले. त्यांनी धाडस दाखवून त्यांचा प्राण वाचवण्यासाठी प्रयत्न केले. मात्र त्यांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे गुळसडीत शोकाकुल वातावरण झाले आहे. ननवरे यांना स्व. नामदेवराव जगताप यांनी यशवंतराव चव्हाण महाविद्यालयामध्ये नोकरी दिली होती. त्यांना वाचवण्यासाठी स्व. नामदेवराव जगताप यांचे नातू पृथ्वीराज जगताप यांनी प्रयत्न केले. मात्र काळाने त्यांना घेरले. आणि प्राण गेला अशी चर्चा रंगली होती.
करमाळा बंद! बाईक रॅलीत मराठासह इतर समाजबांधव; महापुरुषांना पुष्पहार अर्पण करत जरांगेंना पाठींबा
करमाळा एसटी बसची अवस्था सोशल मीडियावर मांडली जात आहे. करमाळा बसस्थानकातून पुण्याकडे जाणारी एसटी बस २० किलोमीटरवर बंद पडली. दोन तास त्यामध्ये गेले. बस बिघडली नसती तर ननवरे हे पुणे येथे पोहचले असते आणि सिटीमध्ये त्यांना उपचार घेणे शक्य झाले असते. त्यांना वाचवण्यासाठी जगताप यांनी केलेला प्रयत्न यशस्वी होऊ शकला नाही.