A circumcision camp at Karmala on behalf of the Muslim Development Council

करमाळा (सोलापूर) : दरवर्षीप्रमाणे यंदाही मुस्लिम विकास परिषदेच्या वतीने मुस्लिम समाजातील लहान बालकांचे खतना कॅम्प नालबंद हॉल येथे झाला. यामध्ये 158 मुस्लिम बालकांची खतना स्पेशालिस्ट डॉ. उजेर बेग सोलापूर यांच्या हस्ते शस्त्रक्रिया करण्यात आली, असल्याचे मुस्लिम विकास परिषदेचे अध्यक्ष फारुक जमादार यांनी सांगितले.

आज (शनिवारी) सकाळी ७ वाजता मौलाना मोहसीन शेख, मौलाना सिकंदर मौलाना अन्वर यांच्या उपस्थितीत प्रार्थना करून खतना कॅम्पला सुरुवात करण्यात आली. यावेळी फारुक बेग, बकश शेख, जावेद शेख, समीर सिकंदर शेख, शाहरुख शेख, असीम बेग, समीर दाऊद शेख, आयान बेग उपस्थित होते.

मौलाना मोहसीन म्हणाले, इस्लाम धर्मात खतनाला विशेष महत्त्व आहे. मुस्लिम विकास परिषदेच्या वतीने दरवर्षी कॅम्प राबवून मुस्लिम समाजातील बालकांची एक उत्तम सोय केली जात आहे. या कॅम्पला मुस्लिम समाजाचे अध्यक्ष हाजी उस्मान शेठ तांबोळी, सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक सेलचे माजी जिल्हाध्यक्ष ऍड. वजीर शेख, सावंत गटाचे सुनील सावंत, माजी नगरसेवक अल्ताफ तांबोळी, माजी नगरसेवक संजय सावंत, ऍड. नईम काजी, सुरज शेख, मुस्तकीन पठाण आदींनी कॅम्पला भेट दिली. खतना कॅम्प यशस्वी करण्यासाठी समद दाळवाले, अरबाज बेग, फिरोज बेग, तौफिक शेख, जमीर मुलाणी, हमीद सय्यद, इरफान मिर्झा, पप्पू पठाण, आफताब पठाण, शाहीद बेग, नदीम शेख, नवाज बेग, साहील शेख, अमन शेख यांनी परिश्रम घेतले.

By kaysangtaa.21

पुणे, मुंबई, पिंपरी चिंचवड, सोलापूर व नगर येथे ‘पुढारी’, ‘प्रभात’ व ‘सकाळ’मध्ये बातमीदार व उपसंपादक म्हणून काम करत पत्रकारितेचा अनुभव घेतल्यानंतर 'काय सांगता' हे न्यूज पोर्टल सुरु करण्यात आले आहे. या पोर्टलवरील प्रत्येक बातमी विश्वसनीय असते. करमाळा येथील बातम्यांसाठी अशोक मुरूमकर संपर्क : ९९२३१७५०२४ कार्यालय पत्ता : डॉ. बाबासाहेब आंबेडकर शॉपिंग सेंटर, गाळा नं. ४७, पेट्रोल पंपाजवळ, जुनी भाजी मंडई, वरचा मजला करमाळा, जि. सोलापूर- ४१३२०३. मेल आयडी : kaysangtaa.21@gmail.com जाहिरातीसाठी संपर्क : ९९२३१७५०२४

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *