करमाळा (सोलापूर) : सकल धनगर समाजाच्या वतीने आज (सोमवारी) सकाळी ११ वाजता करमाळा येथील मौलालीमाळ चौक येथे रास्ता रोको आंदोलन होणार आहे. राज्यातील धनगर समाजाला अनुसूचित जमाती (S.T.) आरक्षणाची अंमलबजावणी करावी या मागणीसाठी हे आंदोलन असणार आहे. धनगर समाजाचे सहाजण पंढरपूर व लातूर येथे १५ दिवसांपासून उपोषण करत आहेत. परंतु सरकारने त्यांची विचारपूसही केली नाही. उपोषणकर्ते यांची प्रकृती गंभीर होत आहे. समाजासाठी आंदोलन करणाऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी नगर- टेंभुर्णी महामार्गावर मौलालीमाळ चौक येथे हा सकल धनगर समाजाच्या वतीने रास्ता रोको होणार आहे. यामध्ये सर्व समाज बांधवांनी सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले.
आजोबांनी नोकरी दिली, नातवाचा प्राण वाचवण्यासाठी प्रयत्न पण… करमाळ्यातील एसटी बसच्या घटनेने सर्वत्र हळहळ