20 lakhs sanctioned for sewerage construction in Sumantanagar area

करमाळा (सोलापूर) : करमाळा नगरपालिकेला महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान अभियानअंतर्गत आमदार संजयमामा शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली करमाळा नगरपालिकेला प्रभाग क्रमांक एक व दोन मधील विकास कामांसाठी 1 कोटी 12 लाख 99 हजार 354 रुपये मंजूर झाले आहेत, अशी माहिती माजी नगरसेवक संजय सावंत यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे. यामध्ये सावंत यांनी म्हटले आहे की, प्रभाग क्रमांक एक व दोन मधील विकास काम गणेश बोरा घर ते पिंटू बेग घर रस्ता डांबरीकरण करणे ६ लाख १७ हजार ७५० रुपये, गणेश बोरा घर ते पिंटू बेग घर गटार बांधकाम करणे ३१ लाख ८९ हजार २ रूपये, मोहल्ला गल्ली येथील विविध परिसरात गटार बांधकाम करणे ५० लाख २८ हजार २६८ रुपये, सावंत गल्ली येथील सार्वजनिक शौचालय परिसर सुशोभित करणे २४ लाख ६४ हजार ३४४ रुपये मंजूर झाले आहेत, असे त्यांनी म्हटले आहे.

By kaysangtaa.21

पुणे, मुंबई, पिंपरी चिंचवड, सोलापूर व नगर येथे ‘पुढारी’, ‘प्रभात’ व ‘सकाळ’मध्ये बातमीदार व उपसंपादक म्हणून काम करत पत्रकारितेचा अनुभव घेतल्यानंतर 'काय सांगता' हे न्यूज पोर्टल सुरु करण्यात आले आहे. या पोर्टलवरील प्रत्येक बातमी विश्वसनीय असते. करमाळा येथील बातम्यांसाठी अशोक मुरूमकर संपर्क : ९९२३१७५०२४ कार्यालय पत्ता : डॉ. बाबासाहेब आंबेडकर शॉपिंग सेंटर, गाळा नं. ४७, पेट्रोल पंपाजवळ, जुनी भाजी मंडई, वरचा मजला करमाळा, जि. सोलापूर- ४१३२०३. मेल आयडी : kaysangtaa.21@gmail.com जाहिरातीसाठी संपर्क : ९९२३१७५०२४

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *