Divali 2024 Karmala news kay sangtaa viral news marathi news marathi newsDipawali

सोलापूर : दिपावलीनिमित्त जिल्हयात शोभेच्या दारु विक्रीचे (फटाके विक्रीचे) तात्पुरते परवाने वितरीत करण्यात येणार आहेत. त्यासाठी विहित नमून्यातील (एलई- 5) अर्ज जिल्हाधिकारी कार्यालय येथे उपलब्ध असल्याचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी सांगीतले आहे.
‘या’ सहा मुद्द्यांवर आमदार शिंदे यांना विरोधकांकडून घेरण्याचा प्रयत्न! सोशल मीडियावर ३ हजार कोटींवरून प्रश्न

अर्जातील माहिती पूर्णपणे भरुन त्यासोबत अर्जदाराचे दोन फोटो, ग्रामपंचायत/ नगरपालिका/ नगरपरिषद यांच्याकडील विहीत मृद्दयांबाबतचे ना- हरकत प्रमाणपत्र, 18 वर्ष पूर्ण झालेबाबतचा वयाचा पुरावा (एल. सी./ जन्मदाखला) संबंधित जागेचे 7/12 किंवा मिळकत उतारा व नकाशा जागेबाबत स्थानिक प्राधिकरणाचे संमतीपत्र स्वं॑यघोषणापत्र आदी आवश्यक असलेली कागदपत्रे जोडावीत.
Karmala Politics प्रा. झोळ यांच्यामुळे गावागावात नवीन कार्यकर्त्यांना संधी

अर्जांच्या चौकशीअंती 600 रुपये चलनाने भरलेले परवाना फी तसेच यापूर्वी काढण्यात आलेल्या परवान्याची प्रत इत्यादीसह परीपूर्ण अर्ज 14 ऑक्टोबरपर्यंत (सुट्टीचे दिवस वगळून) सादर करावेत. परवाने देणेपूर्वी पोलिस विभागाकडून चौकशी अहवाल प्राप्त होणे आवश्यक असल्याने दिलेल्या मुदतीनंतर आलेल्या अर्जांचा विचार केला जाणार नाही, याची नोंद घ्यावी. तसेच सदर कामकाजाच्या कोणत्याही टप्प्यावर सरकार व न्यायालयाकडील प्राप्त निर्देश, अटी व शर्ती हे तात्पुरते परवानाधारक/ अर्जदार यांचेवर बंधनकारक राहतील.
‘या’ सहा मुद्द्यांवर आमदार शिंदे यांना विरोधकांकडून घेरण्याचा प्रयत्न! सोशल मीडियावर ३ हजार कोटींवरून प्रश्न

परवान्याबाबत अधिक माहितीसाठी गृह शाखा, जिल्हाधिकारी कार्यालय, सात रस्ता, शासकीय दुध डेअरी शेजारी सोलापूर येथे संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हादंडाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी केले आहे.

By kaysangtaa.21

पुणे, मुंबई, पिंपरी चिंचवड, सोलापूर व नगर येथे ‘पुढारी’, ‘प्रभात’ व ‘सकाळ’मध्ये बातमीदार व उपसंपादक म्हणून काम करत पत्रकारितेचा अनुभव घेतल्यानंतर 'काय सांगता' हे न्यूज पोर्टल सुरु करण्यात आले आहे. या पोर्टलवरील प्रत्येक बातमी विश्वसनीय असते. करमाळा येथील बातम्यांसाठी अशोक मुरूमकर संपर्क : ९९२३१७५०२४ कार्यालय पत्ता : डॉ. बाबासाहेब आंबेडकर शॉपिंग सेंटर, गाळा नं. ४७, पेट्रोल पंपाजवळ, जुनी भाजी मंडई, वरचा मजला करमाळा, जि. सोलापूर- ४१३२०३. मेल आयडी : kaysangtaa.21@gmail.com जाहिरातीसाठी संपर्क : ९९२३१७५०२४

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *