करमाळा (अशोक मुरूमकर) : करमाळ्यातील श्री कमलाभवानी देवी हे प्रसिद्ध देवस्थान आहे. नवरात्रोत्सवानिमित्त येथे नऊ दिवस यात्रा भरते. त्यानिमित्त वेगवेगळ्या ठिकाणावरून भाविक येथे दर्शनासाठी येतात. चिमुकल्यांसाठी ही यात्रा म्हणजे पर्वणीच असते. मोठे व लहान पाळणे येतात. खाऊचे स्टोलही येथे लागतात. मात्र येथील यात्रेचे स्थळ यावर्षी वादात सापडले आहे. देवस्थांनमधील पुजारी, सेवक, सरपंच व शिवसेनेचे जिल्हा प्रमुख महेश चिवटे यांचे नेमके काय मत आहे हे याचा ‘काय सांगता’ न्यूज पोर्टलने घेतलेला हा आढावा.
गुरुवारी (३ ऑक्टोबरला) घटस्थापना होऊन नवरात्रोत्सवाला सुरुवात होत आहे. त्याच दिवशी यात्रेलाही सुरुवात होत आहे. त्यापार्श्वभूमीवर ९६ विहिरीच्या बाजूला पाळणे उभारण्यात आले आहेत. वीज वितरण कंपनीच्या बाजूला असलेल्या मोकळ्या जागेतही पाळणे उभारण्याचे नियोजन झाले होते. मात्र पाळणेवाले येत असल्याचे समजताच त्यांना गावकऱ्यांनी परत पाठवले. त्यावर शिवसेनेचे जिल्हा प्रमुख महेश चिवटे यांनी आक्रमक भूमिका घेतली. त्यावरून श्रीदेवीचामाळ येथील ग्रामस्थ व चिवटे यांच्यात हा वाद असल्याचे बोलले जात आहे.
येथील पाळणे कोठेही हलवू नयेत असे म्हणणे स्थानिक नागरिकांचे आहे. तर आम्ही यात्रा कोठेही हलवत नाही. फक्त नेहमी जेथे पाळणे असतात तेथे जागा कमी पडत आहे. आणि नागरिकांसाठी पैसे जास्त घेतले जातात. त्यामुळे आम्ही खालच्या बाजूला पाळणे लावण्याचे नियोजन केले होते, असे चिवटे यांनी सांगितले आहे. हे नियोजन मी एकट्याने नव्हे तर आणखी काही सहकारी आमच्याबरोबर आहेत. श्रीदेवीचामाळ येथील सरपंच यांच्यासह अनेक नागरिकांनी याला विरोध केला आहे. ३०० वर्षाची ही परंपरा मोडीत काडू नये येथील यात्रा हलवली तर देवीचे पवित्र कमी होईल. त्यामुळे येथील यात्रा हलवण्याचा कोणीही प्रयत्न करू नये, असे सरपंच फलफले म्हणाले आहेत. हा विषय नेमका काय आहे हे पहाण्यासाठी खालील व्हिडीओ पहा…