करमाळा (सोलापूर) : मॉर्निग वाॅक ग्रुपच्या तत्परतेने करमाळ्यात एका महिलेचे प्राण वाचले आहेत. करमाळा- कर्जत रस्त्यावरील धर्मसंगीत मंगल कार्यालयासमोर कुत्रे आडवे आल्याने एका मोटारसायकलचा अपघात झाला. यामध्ये एक महिला जखमी झाली. नाकुसा पोपट नलवडे (रा. टेंभुर्णी) असे जखमी झालेल्या महिलेचे नाव आहे. त्यांच्याबरोबर एक लहान मुलगी अनुष्का ताटे ही किरकोळ जखमी झाली होती. त्यांना पहाटे फिरायला जाणाऱ्या माॅर्नीग वाॅक ग्रुपने मदत केली.
राष्ट्रवादीचे हनुमंत मांढरे पाटील, माजी नगरसेवक फारुक जमादार, गणेश जाधव, पत्रकार नासीर कबीर, इमरान घोडके, सचिन माने, गोकुळ कोकाटे, अशोक बरडे व इतर सहकारी यांनी जखमी अवस्थेत असणारी महिलेला उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी तातडीने दाखल केले. यावेळी उपजिल्हा रुग्णालयातील डॉ. भोसले, अविनाश धेंडे, सचिन जवकर व इतर कर्मचारी यानी त्यांच्यावर तातडीने उपचार केले. यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख महेश चिवटे यांनी जखमी महीलेच्या नातेवाईकांचा शोध घेऊन फोन वरुन संपर्क साधुन त्यांना अपघाताविषयी माहिती दिली.