maka karmala news kay sangtaa kaysangtaa krushiशेलगाव येथील पाठवण्यात येत असलेली मका.

करमाळा (सोलापूर) : शेतकऱ्यांनी संघटित शेती केली तर त्याचा काय फायदा होतो याची प्रचिती शेलगाव क येथील कृषीक्रांती शेतकरी गटाला आला आहे. त्यांनी राजे रावरंभा शेतकरी प्रोड्युसर कंपनीच्या मदतीने सह्याद्री फार्मर कंपनी नाशिक यांच्याबरोबर स्वीट कॉर्न मकेचा करार करून तीन दिवसात ३० टन मका पाठवली. त्याला बाजारभावापेक्षा सरासरी दुप्पट भाव मिळाला. सामूहिक शेती केल्याने खर्चही कमी झाला आणि शेतकऱ्यांचे उत्पन्नही वाढले. त्यामुळे करार शेतीचा राजे रावरंभा शेतकरी प्रोड्युसर कंपनीचा प्रयोग यशस्वी झाला असून शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.

सत्यमेव जयते फार्मर कप स्पर्धेमध्ये सहभाग घेतलेल्या शेलगाव क कृषीक्रांती शेतकरी गटातील सर्व सदस्यांनी स्वीट कॉर्न मका हे दुसरे पीक निवडले. ७० दिवसात ७०००० हे सूत्र डोळ्यासमोर ठेवून त्यांनी स्वीट कॉर्न मक्याची लागवड जुलै २०२४ मध्ये केली. २० सप्टेंबरनंतर स्वीट कॉर्न मक्याचे हार्वेस्टिंग झाले. बाजारामध्ये ६ ते ७ रुपये प्रति किलो हा दर असताना सह्याद्री फार्मर कंपनीने प्रत्यक्षात १३ रुपये प्रति किलो दर दिला. त्यामुळे शेतकऱ्यांना अधिकचे पैसे मिळाले.विशेष महत्त्वाची बाब म्हणजे ११ रुपये प्रति किलो दराने करार ठरलेला असूनही प्रत्यक्षात त्यापेक्षा अधिक दर सह्याद्री फार्मर प्रोड्युसर कंपनीने दिल्यामुळे करमाळा तालुक्यातील इतर अनेक शेतकऱ्यांना स्वीट कॉर्न मक्याची लागवड करण्याची सुवर्णसंधी प्राप्त झाली आहे.

रब्बी हंगामात किमान ५० एकर लागवड गावात होईल.खरीप हंगामात १५ एकर क्षेत्रावरती केलेला स्वीट कॉर्न मकेचा प्रयोग यशस्वी झाल्यामुळे आमच्या शेतकरी गटाबरोबरच गावातील इतर शेतकऱ्यांचा आत्मविश्वास वाढलेला आहे त्यामुळे रब्बी हंगामात आमच्या शेलगाव क गावामध्ये किमान ५० एकर मक्याची लागवड होईल असा विश्वास आहे.
गणेश माने, शेलगाव क कृषी क्रांती शेतकरी गट

By kaysangtaa.21

पुणे, मुंबई, पिंपरी चिंचवड, सोलापूर व नगर येथे ‘पुढारी’, ‘प्रभात’ व ‘सकाळ’मध्ये बातमीदार व उपसंपादक म्हणून काम करत पत्रकारितेचा अनुभव घेतल्यानंतर 'काय सांगता' हे न्यूज पोर्टल सुरु करण्यात आले आहे. या पोर्टलवरील प्रत्येक बातमी विश्वसनीय असते. करमाळा येथील बातम्यांसाठी अशोक मुरूमकर संपर्क : ९९२३१७५०२४ कार्यालय पत्ता : डॉ. बाबासाहेब आंबेडकर शॉपिंग सेंटर, गाळा नं. ४७, पेट्रोल पंपाजवळ, जुनी भाजी मंडई, वरचा मजला करमाळा, जि. सोलापूर- ४१३२०३. मेल आयडी : kaysangtaa.21@gmail.com जाहिरातीसाठी संपर्क : ९९२३१७५०२४

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *