Rashmi Bagal and Ramdas Zol took applications 10 application filed today for Karmala Assembly

करमाळा (सोलापूर) : करमाळा विधानसभा मतदारसंघासाठी आज (शुक्रवारी) सात व्यक्तींनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. तर 10 इच्छुकांनी 16 अर्ज खरेदी केले आहेत, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी अंजली मरोड यांनी दिली आहे. यावेळी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी शिल्पा ठोकडे उपस्थित होत्या. आज अर्ज घेतलेल्यांमध्ये भाजपच्या नेत्या रश्मी बागल व प्रा. रामदास झोळ यांचा समावेश आहे.

करमाळा विधानसभा मतदारसंघात 62 जणांनी 108 अर्ज घेतले आहेत. तर माजी आमदार नारायण पाटील यांच्यासह 13 जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. आज दाखल झालेल्या अर्जामध्ये जिंती येथील ऍड. मोहम्मद जमीर कलिंदर शेख यांनी अपक्ष, पोफळज येथील जालिंदर कांबळे यांनी अपक्ष, कंदर येथील ऍड. महादेव कदम यांनी बहुजन समाज पार्टी, करमाळ्यातील विनोद सीतापूरे यांनी अपक्ष, वांगी १ येथील गणेश भानवसे यांनी अपक्ष, बाळेवाडीतील मधुकर मिसळ यांनी बहुजन मुक्ती पार्टी व कुर्डुवाडीतील गणेश घुगे यांनी अपक्ष अर्ज दाखल केला आहे.

ज्ञानदेव कदम, गणेश कराड, भारत शिंदे, अनिरुद्ध राऊत, प्रियांका गायकवाड, सुहास घोलप, गणपत भोसले व संभाजी भोसले यांनी स्वतःसाठी तर ज्ञानेश्वर शिंदे यांनी प्रा. झोळ यांच्यासाठी व रवींद्र मोहोळ यांनी बागल यांच्यासाठी अर्ज घातले आहेत.

By kaysangtaa.21

पुणे, मुंबई, पिंपरी चिंचवड, सोलापूर व नगर येथे ‘पुढारी’, ‘प्रभात’ व ‘सकाळ’मध्ये बातमीदार व उपसंपादक म्हणून काम करत पत्रकारितेचा अनुभव घेतल्यानंतर 'काय सांगता' हे न्यूज पोर्टल सुरु करण्यात आले आहे. या पोर्टलवरील प्रत्येक बातमी विश्वसनीय असते. करमाळा येथील बातम्यांसाठी अशोक मुरूमकर संपर्क : ९९२३१७५०२४ कार्यालय पत्ता : डॉ. बाबासाहेब आंबेडकर शॉपिंग सेंटर, गाळा नं. ४७, पेट्रोल पंपाजवळ, जुनी भाजी मंडई, वरचा मजला करमाळा, जि. सोलापूर- ४१३२०३. मेल आयडी : kaysangtaa.21@gmail.com जाहिरातीसाठी संपर्क : ९९२३१७५०२४

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *