करमाळा (अशोक मुरूमकर) : करमाळ्याला तहसीलदार नसल्याने नागरिकांची कामे रखडलेली आहेत, अशा नागरिकांच्या तक्रारी आहेत. त्या तक्रारी सोडवण्यासाठी आमदार संजयमामा शिंदे यांनी आज (शुक्रवारी) तहसील कार्यालयात स्वतः बसून प्रयत्न केला. कोणत्याही नागरिकाचे काम लांबणार नाही याची दक्षता घेण्याची सूचना यावेळी प्रभारी तहसीलदार विजयकुमार जाधव यांना आमदार शिंदे यांनी केली. दरम्यान जाधव यांनी मनुष्यबळाची अडचण असल्याचे सांगताच आमदार शिंदे यांनी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांना फोन लावून मनुष्यबळ उपलब्ध करण्याबाबत सांगितले आहे.

‘पीएम किसानचे पैसे मिळत नाहीत याबाबत तहसील कार्यालयात तक्रार करूनही सोडवणूक होत नसल्याची तक्रार एका शेतकऱ्याने केली. त्यावर संबंधित कर्मचाऱ्याला तत्काळ तक्रार सोडवणूक करण्याचे सांगण्यात आले. सौन्दे येथील एका वयोवृद्ध दांपत्याने स्वस्त धान्य दुकानातून धान्य मिळत नसल्याचे सांगितले. त्यावर आमदार शिंदे यांनी यावर तत्काळ सर्व दुकानदारांची बैठक घेऊन कोणीही गरजू धान्यापासून वंचीत राहणार नाही, अशा सूचना द्या, असे सांगितले आहे. दरम्यान पत्रकार विशाल घोलप यांनी काही ठिकाणी राजकीय हेतूने स्वस्त धान्य दुकानदार लाभार्थ्यांना धान्य देत नसल्याचे सांगितले. त्यानंतर भोसेचे भोजराज सुरवसे यांनीही असे प्रकार घडत असल्याचे सांगितले. पत्रकार अशोक मुरूमकर यांनी मराठा कुणबी नोंदीबाबत प्रश्न मांडला. इतर ठिकाणी म्हणजे श्रीगोंदा, आष्टी येथे करमाळ्यातील काही व्यक्तींच्या नोंदी सांपडण्याची शक्यता आहे. त्या आपल्याकडे मिळ्वण्याबाबत सूचना केली. त्यावर जिल्हाधिकाऱ्याशी यावर चर्चा केली जाईल, असे आमदार शिंदे यांनी सांगितले आहे. करमाळ्याला तहसीलदार कधी मिळतील असा प्रश्न यावेळी करण्यात आला होता. त्यावर पाठपुरावा सुरु आहे. मात्र यामध्ये मुख्यमंत्र्यांनी यामध्ये लक्ष घालण्याची गरज असल्याचे आमदार शिंदे यांनी यावेळी सांगितले.

शेतजमिनीतील रस्ते, पुरवठा विभागातील तक्रारी व वारस नोंदीबाबत तक्रारीचा पाडा यावेळी वाचण्यात आला. सामाजिक कार्यकर्ते सुजित बागल यांनीही यावेळी अनेक तक्रारी मांडल्या. आमदार शिंदे यांचे स्वीसह्यक डॉ. विकास वीर यांनी सर्व निवेदने स्वीकारली असून त्याची सूडवणूक करण्यासाठी पाठपुरावा केला जाणार आहे. पत्रकार विवेक येवले, ऍड. राहुल सावंत, वाशिंबेचे सरपंच तानाजी झोळ, बिटरगाव श्री येथील सामाजिक कार्यकर्ते बबनराव मुरूमकर, ग्रामपंचायत सदस्य चतृभूज मुरूमकर, अर्बन बँकेचे माजी संचालक चंद्रकांत चुंबळकर, देवळालीचे आशिष गायकवाड, सरपंच गणेशकर, फारूक जमादार, पोलिस पाटील संघटनेचे संदीप पाटील आदी यावेळी उपस्थित होते.

या’ होत्या तक्रारी

  • मकाई सहकारी साखर कारखान्याने अद्याप शेतकऱ्यांचे ऊस बिल दिलेले नाही. त्यामुळे संचालक मंडळावर गुन्हे दाखल करावेत
  • स्वस्त धान्य दुकानातून धान्य मिळत नाही
  • रस्ता केस मार्गी लागत नाहीत
  • बीडीओ सतत रजेवर जात आहेत
  • पाण्याचे टँकर सुरु करावेत
  • करमाळ्याला तहसीलदार कधी मिळतील

By kaysangtaa.21

पुणे, मुंबई, पिंपरी चिंचवड, सोलापूर व नगर येथे ‘पुढारी’, ‘प्रभात’ व ‘सकाळ’मध्ये बातमीदार व उपसंपादक म्हणून काम करत पत्रकारितेचा अनुभव घेतल्यानंतर 'काय सांगता' हे न्यूज पोर्टल सुरु करण्यात आले आहे. या पोर्टलवरील प्रत्येक बातमी विश्वसनीय असते. करमाळा येथील बातम्यांसाठी अशोक मुरूमकर संपर्क : ९९२३१७५०२४ कार्यालय पत्ता : डॉ. बाबासाहेब आंबेडकर शॉपिंग सेंटर, गाळा नं. ४७, पेट्रोल पंपाजवळ, जुनी भाजी मंडई, वरचा मजला करमाळा, जि. सोलापूर- ४१३२०३. मेल आयडी : kaysangtaa.21@gmail.com जाहिरातीसाठी संपर्क : ९९२३१७५०२४

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *