करमाळा (अशोक मुरूमकर) : माझी राजकीय सुरवात जगताप यांच्यापासूनच झाली आहे. मतदारांनी मला २०१४ मध्ये विधानसभेत पाठवले त्याच विश्वासाने मी कामे केली. गेल्या निवडणुकीत माझा पराभव झाला असला तरी पाच वर्षात नागरिकांची मी प्रामाणिक काम केले. आताचे आमदार सांगत आहेत मी विकासासाठी निधी आणला मग विकास तर दिसत नाही निधी गेला कोठे, असे म्हणत माजी आमदार नारायण पाटील यांनी आमदार शिंदे यांचे नाव न घेता टोला लगावला.
करमाळ्यात माजी आमदार नारायण पाटील यांना विधानसभेसाठी माजी आमदार जयवंतराव जगताप यांनी पाठींबा दिला आहे. यावेळी आमदार रोहित पवार, शंभूराजे जगताप, वैभवराजे जगताप, देवानंद बागल, डॉ. अमोल घाडगे, गणेश कवडे, सुभाष गुळवे, नवनाथ झोळ, सवितादेवी राजेभोसले आदी उपस्थित होते.
माझी राजकीय सुरवात जगताप यांच्यापासूनच झाली आहे. मतदारांनी मला २०१४ मध्ये विधानसभेत पाठवले त्याच विश्वासाने मी कामे केली. गेल्या निवडणुकीत माझा पराभव झाला असला तरी पाच वर्षात नागरिकांची मी प्रामाणिक काम केले. आताचे आमदार सांगत आहेत मी विकासासाठी निधी आणला मग विकास तर दिसत नाही निधी गेला कोठे, असे म्हणत त्यांनी आमदार शिंदे यांचे नाव न घेता टोला लगावला.
पुढे बोलताना पाटील म्हणाले, पाच वर्षात मला तुम्ही संधी दिली तेव्हा रावगाव भागात कुकडीचे सर्वाधिक आवर्तने सुटण्यासाठी मी प्रयत्न केला. त्यासाठी चारीवर मी स्वतः गस्त घातला. कुकडी आपल्यापासून लांब आहे. त्यामुळे आपल्याला पाणी मिळत नाही त्यासाठी आपल्याला रिटेवाडी योजना होणे आवश्यक आहे. आणि त्यासाठी आम्ही देशाचे नेते शरद पवार यांच्याकडे पाठपुरावा करत आहोत. संतोष वारे यांच्याच घरी त्यांनी आंदोलनकर्त्यांना आश्वासन दिले होते आणि तो बी भाग निश्चिततपणे ओलाताखाली आणणार आहे, असे माजी आमदार पाटील म्हणाले.
पाटील म्हणाले, ‘बाजार समितीत माझी आणि जयवंतराव जगताप यांची भेट झाली तेव्हा तुझे आणि माझे काहीही नाही असे म्हणत पवार यांच्या नेतृत्वात काम करण्याचे ठरवले.’