रस्त्यात पाणी ‘मुरतंय’! करमाळ्यात उडाणपुलाजवळ डांबरीवर पावसाने खड्डे; गटारीतही पाणी जात नाही

Potholes on tarmac near Udan bridge in Karmala due to rain

करमाळा : कोर्टी ते आवाटी रस्त्याचे काम पूर्णत्वाच्या मार्गावर आहे. मात्र पहिल्याच मोठ्या पावसात रस्त्याचे काम चव्हाट्यावर आले आहे. उडाणपुलाजवळील कमान व चिंचेचे झाडादरम्यान डांबरी रस्त्यावर पावसाने लहान लहान खड्डे पडले आहेत. या खड्ड्याची आज (गुरुवारी) पत्रकारांनी पहाणी केल्यानंतर अक्षरक्षा ते कामच निकृष्ट असल्याचे वास्तव समोर आले आहे.

कोर्टी ते आवाटी रस्ता करमाळा शहरातून जातो. नगर ते टेंभुर्णी महामार्गाच्या बायपासवरील अर्धवट अवस्थेतील उड्डाणपुल सध्या धोक्याचा झाला आहे. श्रीदेवीचामाळ ते उड्डाणपूल दरम्यान डांबरीकरणाचे काम पूर्ण झाले आहे मात्र ते निकृष्ट आहे. येथील गटारीचे कामही चुकीचे झाले आहे. कोट्यवधी रुपये खर्च करूनही गटारीत रस्त्यावरचे पाणी जात नाही. पाण्यासाठी ठेवलेले छिद्र आणि डांबरी यामध्ये चार बोटाचे अंतर आहे. त्यामुळे पाण्याचा निचरा निचरा होत नाही. डांबरी टाकताना निकृष्ट दर्जाचे असल्याचे दिसत आहे.

श्रीदेवीचामाळकडे जाणारा रस्ता अतिशय निकृष्ट आहे. पहिल्याच पावसात डांबरीवाहून गेली आहे. त्यामुळे लहान खड्डे पडले आहेत. तेथे हाताने उकरले तरी डांबरी निघत आहे. त्यामुळे या रस्त्याचा दर्जा तपासणे आवश्यक आहे. हा रस्ता चांगला होणे आवश्यक आहे.

  • अंगद देवकाते, जिल्हा सरचिटणीस, राष्ट्रीय समाज पक्ष

डांबरीवरील पाण्याचा निचरा व्हावा म्हणून बाजूने गटारी तयार केल्या आहेत. मात्र गटार आणि डांबरी यामध्ये अंतर आहे. त्यामुळे या गटारीत पाणी जात नाही. काही ठिकाणी तर गटारीचे कामही झाले नाही. हा रस्ता करताना खोदाई करून तेच साहित्य त्यात वापरण्यात आले आहे. त्यामुळे हे काम निकृष्ट झाले आहे. या कामाची चौकशी करण्यात यावी.

  • सुनील भोसले, जिल्हाध्यक्ष, भीम दल

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *