करमाळा (अशोक मुरूमकर) : ‘आमदार संजयमामा शिंदे यांच्या काळात म्हणजे २०१९ ते २४ दरम्यान करमाळा विधानसभा मतदारसंघाचा विकास झाला आहे. मांगी तलाव हा कुकडीच्या पाण्यावर अवलंबून आहे. या भागाला पाणी आणण्यासाठी आमदार संजयमामा शिंदे हे प्रयत्न करत आहेत. कुकडी उजनी उपसासिंचन योजना पूर्ण करण्यासाठी आमदार शिंदे हे प्रयत्नशील आहेत’, असे प्रतिपादन करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक चंद्रकांत सरडे यांनी केले आहे.
वीट येथे आमदार संजयमामा शिंदे यांच्या प्रचारार्थ आज (शुक्रवार) सभा झाली. यावेळी परिसरातील पदाधिकारी व नागरिक उपस्थित आहेत. सरडे म्हणाले, ‘आमदार शिंदे यांनी आमच्या रस्त्यासाठी १६ कोटी निधी दिला आणि आधुनिक तंत्रज्ञान वापरून १६ च दिवसात केला. कोणताही विकास हा लगेच होत नसतो. जी कामे झाली आहेत त्याचेही विरोधकांनी समाजापुढे दाखवावे. आमदार शिंदे हे चांगले काम करत आहेत, त्यांना पुन्हा आमदार करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले. आमदार शिंदे यांनी सर्वसामान्य नागरिकांचे काम करताना कधीही राजकारण केले नाही. तालुक्याचा विकास करण्यासाठी हुशार माणूस हवा आहे’, असे ते म्हणाले. सरडे यांनी आमदार शिंदे यांना निधीवरून केल्या जाणाऱ्या टीकेला उत्तर दिले.