करमाळा (सोलापूर) : नागोबाचा संभाळ करणाऱ्या शेटफळ गावाविषयी पत्रकार गजेंद्र पोळ लिखीत “माझं शेटफळ नागोबाचे ” या पुस्तकाचे पंढरपूर येथील वासकर फडाचे प्रमुख ह.भ.प. राणा महाराज वासकर यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.

देशातील आगळे वेगळे वैशिष्ट्ये असलेल्या गावातील महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यातील शेटफळ नागोबाचे या गावाविषयी अभ्यासकांबरोबरच अनेकांच्या मनामध्ये कुतूहल आहे. या ठिकाणी राज्यातूनच नव्हे तर देशातून परदेशातून अनेक लोक येऊन माहिती घेत असतात. या गावाविषयी अधिक माहितीसाठी लोकांना मिळावी यासाठी पत्रकार गजेंद्र पोळ यांनी लिहिलेल्या व जिव्हाळा ग्रुप प्रकाशनाने प्रकाशित केलेल्या “माझं शेटफळ नागोबाचे” या पुस्तकाचे प्रकाशन ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे मानकरी, वारकरी फडकरी दिंडी संघटनेचे अध्यक्ष महाराष्ट्रातील प्रसिद्ध वास्कर फडाचे प्रमुख ह.भ.प. देवव्रत (राणा महाराज) वासकर यांच्या हस्ते आज नागनाथ मंदिर शेटफळ या ठिकाणी संपन्न झाले.

यावेळी बोलताना ते म्हणाले की महाराष्ट्रातील अनेक गावांना फार मोठा धार्मिक व सांस्कृतिक वारसा लाभलेला आहे तो येणाऱ्या पुढील पिढ्यांना प्रेरणादायी ठरत असतो या वरशाचे जतन पुढील पिढ्यांनी करणे गरजेचे असून यासंबंधी शेटफळ येथील तरुणांनाचा उपक्रम स्तुत्य असून तो इतरांसाठी मार्गदर्शक ठरणार असल्याचे त्यांनी सांगितले.वासकर महारांबरोबरच प्रसिद्ध कीर्तनकार ह. भ. प. विठ्ठल पाटील महाराज ह. भ. प. आप्पा जाधव महाराज ह. भ. प. आनंद जाधव महाराज ह .भ .प. विलास राठोड महाराज, यांच्या हस्ते या पुरस्कारांचे प्रकाशन करण्यात आले.या पुस्तकाला संत साहित्याचे अभ्यासक, जेष्ठ पत्रकार ॲंड, डॉ. बाबूराव हिरडे यांनी प्रास्तावना‌ दिली असून गावच्या धार्मिक वैशिष्ट्यांबरोबरच गावातील व परिसरातील इतर मंदीरे गावातील सण, उत्सव,शेती याविषयी माहिती दिली आहे. या प्रकाशन कार्यक्रमाला राजाभाऊ रोंगे, विलास पोळ वैभव पोळ, नानासाहेब साळूंके, प्रशांत नाईकनवरे राजेंद्र साबळे विजय लबडे , साहेबराव पोळ जोतीराम जाधव बाळासाहेब पोळ यांच्यासह गावातील प्रमुख मंडळी उपस्थित होते.

By kaysangtaa.21

पुणे, मुंबई, पिंपरी चिंचवड, सोलापूर व नगर येथे ‘पुढारी’, ‘प्रभात’ व ‘सकाळ’मध्ये बातमीदार व उपसंपादक म्हणून काम करत पत्रकारितेचा अनुभव घेतल्यानंतर 'काय सांगता' हे न्यूज पोर्टल सुरु करण्यात आले आहे. या पोर्टलवरील प्रत्येक बातमी विश्वसनीय असते. करमाळा येथील बातम्यांसाठी अशोक मुरूमकर संपर्क : ९९२३१७५०२४ कार्यालय पत्ता : डॉ. बाबासाहेब आंबेडकर शॉपिंग सेंटर, गाळा नं. ४७, पेट्रोल पंपाजवळ, जुनी भाजी मंडई, वरचा मजला करमाळा, जि. सोलापूर- ४१३२०३. मेल आयडी : kaysangtaa.21@gmail.com जाहिरातीसाठी संपर्क : ९९२३१७५०२४

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *