करमाळा (सोलापूर) : करमाळा तालुक्यात विकासाचे नवे पर्व सुरू करण्यासाठी विधानसभा निवडणुकीत प्रा. रामदास झोळ यांना निवडून द्या, असे आवाहन शेतकरी कामगार संघर्ष समितीचे अध्यक्ष दशरथ कांबळे यांनी केले आहे.
जिंती येथे प्रा. झोळ यांच्या प्रचारार्थ सभा झाली. यावेळी मधुकर झोळ, अनुरथ झोळ, पांडुरंग झोळ, प्रा. रामदास झोळ, माया झोळ, दादा साखरे, काँग्रेसचे हरिभाऊ मंगवडे, श्रीकांत साखरे पाटील, काँग्रेसचे गफूर शेख, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा कार्याध्यक्ष रवींद्र गोडगे, वाशिंबेचे माजी सरपंच भगवान डोंबाळे, तुकाराम खाटमोडे, काँग्रेस तालुका उपाध्यक्ष आनंद झोळ, कल्याण दुरंदे, चंद्रशेखर जगताप, रवींद्र धेंडे, संभाजी शिंदे, राजेंद्र बाबर आदी उपस्थित होते.
कांबळे म्हणाले, ‘करमाळा तालुक्यात विकासाच्या मुद्द्यावर प्रस्थापित नेते मते मागत आहेत. सत्ता आपणाकडेच होती तरी रस्ते, पाणी, वीज यासारखे मूलभूत प्रश्न त्यांना सोडवत आले नाहीत. विकासाच्या गप्पा मारून मतदाराची दिशाभूल केल्यामुळे करमाळा तालुका विकासापासून वंचित राहिला. मकाईचे थकीत ३५ कोटींची बिल आम्ही मिळवून दिली. कमलाई, भैरवनाथ, विठ्ठल शुगर्सचे पैसे मिळवून देण्याचे काम प्रा. झोळ यांच्या माध्यमातून आम्ही केले आहे. २०२६ पर्यंत मोठे देवळाली येथे शैक्षणिक संकुल उभा करणार आहेत, असेही ते म्हणाले.
पुढे बोलताना झोळ म्हणाले, ‘शिक्षण संस्थेच्या माध्यमातून २०० मुलांना प्रा. झोळ यांच्यामुळे रोजगार मिळणार आहे. चार उमेदवारांची तुलना करून येणाऱ्या निवडणुकीमध्ये सुशिक्षित, सुसंस्कृत, अभ्यासू, विकासाची दृष्टी असलेले, शेतकरी, कष्टकरी, वंचित समाजाला न्याय मिळवून देणाऱ्या प्रा. झोळ यांना विजयी करावे’, असे आवाहन यावेळी त्यांनी केले. जिंती येथील सभेत भागवत भराटे यांनी त्यांच्या सहकार्यासह झोळ परिवारामध्ये प्रवेश केला.
प्रा. झोळ यांनी यावेळी मनोगत व्यक्त केले. ते म्हणाले, ‘रस्ते, पाणी, वीज याबरोबरच शिक्षण, आरोग्य, रोजगार निर्मितीसाठी आपण पायाभूत काम करणार असून करमाळा तालुक्याचा सर्वांगीण विकासासाठी काम करणार आहे. प्रास्ताविक श्रीकांत साखरे पाटील यांनी केले तर आभार स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा कार्याध्यक्ष रवींद्र गोडगे यांनी मानले.