करमाळा (अशोक मुरूमकर) : ‘करमाळ्यात आमदार संजयमामा शिंदे यांनी पाच वर्षात चांगले काम केले आहे. त्याचा बदल सध्या दिसतो आहे. येणाऱ्या काळात कोणाचे सरकार येईल हे माहित नाही पण जे सरकार येईल ते काटावर येईल असे चित्र आहे. त्यात अपक्षाला चांगली संधी असून संजयमामा यांना तुम्ही पुन्हा आमदार करा. नक्कीच यापेक्षा चांगले दिवस येतील,’ असा विश्वास आमदार बबनदादा शिंदे यांनी व्यक्त केला आहे.

वांगी येथे अपक्ष उमेदवार आमदार संजयमामा शिंदे यांच्या प्रचारासाठी सभा झाली. तेव्हा आमदार बबनदादा बोलत होते. आमदार बबनदादा म्हणाले, ‘पाच वर्ष तुम्ही आमदार म्हणून संजयमामांना संधी दिली. त्यांनी जिल्हा परिषदेचा अध्यक्ष असल्यापासून या भागाचा विकास करण्याचा प्रयत्न केला. सामान्य माणसाला त्यांनी कायम न्याय दिला आहे. करमाळा- टेंभुर्णी महामार्गाचे काम करण्यासाठी त्यांना कायम पाठपुरावा केला आहे. तेव्हा ते काम मार्गी लागलेले आहे. काही मंडळींनी यामध्ये जाणीवपूर्वक अडचणी आणल्या,’ असे ते यावेळी म्हणाले.

पुढे बोलताना आमदार बबनदादा म्हणाले, ‘विठ्ठलराव शिंदे साखर कारखाना झाला तेव्हापासून करमाळा आणि आमचे नाते निर्माण झाले आहे. अडचणीची परिस्थिती असतानाही हा कारखाना दरवर्षी तालुक्यातील ऊस गाळप करत आहे. याचे सर्व पैसे वेळेवर आहेत. आम्ही आमच्या पद्धतीने सतत काम करण्याचा प्रयत्न केला आहे. आमच्या तालुक्यात सध्या चार कारखाने आहेत. तेथे तुळशीच्या लग्नाला ऊसही मिळत नव्हता पण आता तेथील प्रगती झाली आहे. कोणत्याही बाबतीत आमच्याकडून अडवणूक होत नाही. करमाळ्यात केळी संशोधन केंद्र व्हावे म्हणून आमदार संजयमामा यांनी पाठपुरावा केला आहे. याबाबत विधानसभेत त्यांनी प्रश्न उपस्थित केला. आरोग्य क्षेत्रातही त्यांचे चांगले काम आहे. उजनी पर्यटन विकासासाठी आराखडा तयार करून त्याला निधी मिळवला आहे. या धरणात मत्सबीज सोडण्यासाठीही त्यांनी निधी मिळवला आहे’, असे ते म्हणाले.

‘१९९५ ला मी अपक्ष विजयी झालो होतो. केलेल्या कामाचे फळ नक्की मिळते. करमाळ्यात आमदार शिंदे यांच्यामुळे बदल दिसतो आहे. येणाऱ्या काळात कोणाचे सरकार येणार आहे माहित नाही पण जे सरकार येईल ते काटावर येणार आहे. त्यात अपक्षाला चांगली संधी असणार आहे. त्यामुळे तुम्ही आमदार म्हणून संजयमामा यांना संधी द्या’, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

By kaysangtaa.21

पुणे, मुंबई, पिंपरी चिंचवड, सोलापूर व नगर येथे ‘पुढारी’, ‘प्रभात’ व ‘सकाळ’मध्ये बातमीदार व उपसंपादक म्हणून काम करत पत्रकारितेचा अनुभव घेतल्यानंतर 'काय सांगता' हे न्यूज पोर्टल सुरु करण्यात आले आहे. या पोर्टलवरील प्रत्येक बातमी विश्वसनीय असते. करमाळा येथील बातम्यांसाठी अशोक मुरूमकर संपर्क : ९९२३१७५०२४ कार्यालय पत्ता : डॉ. बाबासाहेब आंबेडकर शॉपिंग सेंटर, गाळा नं. ४७, पेट्रोल पंपाजवळ, जुनी भाजी मंडई, वरचा मजला करमाळा, जि. सोलापूर- ४१३२०३. मेल आयडी : kaysangtaa.21@gmail.com जाहिरातीसाठी संपर्क : ९९२३१७५०२४

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *