On the occasion of Constitution Day Upper Collector Tushar Thombare read the purpose paperOn the occasion of Constitution Day Upper Collector Tushar Thombare read the purpose paper

सोलापूर : संपूर्ण देशभरात 26 नोव्हेंबर हा संविधान दिन म्हणून साजरा केला जातो. 26 नोव्हेंबर 1949 रोजी भारताने संविधान स्वीकारले. त्यामुळे 26 नोव्हेंबर हा संविधान दिन म्हणून साजरा केला जातो. सोलापूर जिल्हा प्रशासनाच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अप्पर जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे यांनी पुष्पहार अर्पण करून उद्देश पत्रिकेचे वाचन केले व उपस्थित अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थी व नागरिक यांना संविधान दिनाचे महत्त्व सांगितले.

यावेळी समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त नागनाथ चौगुले, सोलापूर महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त्‍ संदीप कारंजे, इतर मागासवर्गीय बहुजन कल्याण मंडळाच्या सहाय्यक संचालक मनीषा फुले, सहाय्यक कामगार अधिकारी विठ्ठल कस्तुरे यांच्यासह अन्य अधिकारी कर्मचारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी शाहीर रमेश खाडे व विद्यार्थ्यांनी संविधानाचे महत्व विशद करणाऱ्या करणाऱ्या अनेक गीतांचे गायन त्यांनी केले.

By kaysangtaa.21

पुणे, मुंबई, पिंपरी चिंचवड, सोलापूर व नगर येथे ‘पुढारी’, ‘प्रभात’ व ‘सकाळ’मध्ये बातमीदार व उपसंपादक म्हणून काम करत पत्रकारितेचा अनुभव घेतल्यानंतर 'काय सांगता' हे न्यूज पोर्टल सुरु करण्यात आले आहे. या पोर्टलवरील प्रत्येक बातमी विश्वसनीय असते. करमाळा येथील बातम्यांसाठी अशोक मुरूमकर संपर्क : ९९२३१७५०२४ कार्यालय पत्ता : डॉ. बाबासाहेब आंबेडकर शॉपिंग सेंटर, गाळा नं. ४७, पेट्रोल पंपाजवळ, जुनी भाजी मंडई, वरचा मजला करमाळा, जि. सोलापूर- ४१३२०३. मेल आयडी : kaysangtaa.21@gmail.com जाहिरातीसाठी संपर्क : ९९२३१७५०२४

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *