आश्लेषा बागडे गोल्ड मेडल विजेती

करमाळा (सोलापूर) : विद्या विकास मंडळाच्या यशवंतराव चव्हाण महाविद्यालयमधील विद्यार्थिनी आश्लेषा बागडे हिने 57 किलो वजन गटामध्ये फायनलच्या कुस्तीमध्ये महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या वतीने इंदापूर येथे घेण्यात आलेल्या कुस्तीमध्ये कोल्हापूरच्या पूजा पाटील वर चितपटीने विजयी मिळवून गोल्ड मेडल मिळवले आहे. या यशस्वी विद्यार्थिनीला महाविद्यालयाचे शारीरिक शिक्षण शिक्षक प्रा. राम काळे यांनी मार्गदर्शन केले.

या यशाबद्दल संस्थेचे सचिव विलासराव घुमरे, संस्थेचे अध्यक्ष प्राचार्य मिलिंद फंड, संस्थेचे सहसचिव विक्रमसिंह सुर्यवंशी, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एल. बी. पाटील, वरिष्ठ विभागाचे उपप्राचार्य डॉ. अनिल साळुंखे, कनिष्ठ विभागाचे उपप्राचार्य संभाजी किर्दाक, वरिष्ठ व कनिष्ठ विभागातील प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *