कुर्डूवाडीतून धनुष्यबाणाला लीड मिळणार : जिल्हाप्रमुख महेश चिवटे

Dhanushyabana will get lead from Kurduwadi District Head Mahesh Chivte

करमाळा (सोलापूर) : करमाळा विधानसभा मतदारसंघातील कुर्डूवाडीसह ३६ गावात शिवसेनेचे (शिंदे गट) कट्टर शिवसैनिक आहेत. या भागातून दिग्विजय बागल यांच्या धनुष्यबाणाला लीड मिळेल, असा विश्वास जिल्हाप्रमुख महेश चिवटे यांनी व्यक्त केला. कुर्डूवाडी शहरात दररोज शिवसैनिकांच्या वतीने पदयात्रा व होम टू होम प्रचार होत आहे.

पदयात्रा झाल्यानंतर कुर्डूवाडी येथील शिवसेना मध्यवर्ती कार्यालयात झालेल्या कार्यकर्ता मेळाव्यात चिवटे बोलत होते. यावेळी युवा नेते गौरव कोलते, रिंकू घुमरे, शहर प्रमुख समाधान दास, सागर कोल्हे, रोहन बलाकसे, महिला आघाडी प्रमुख मोरे व शिवसेनेचे आजी- माजी नगरसेवक उपस्थित होते. यावेळी बोलताना शहरप्रमुख समाधान दास म्हणाले, कुरूडवाडी शहरातून धनुष्यबाणाला 5000 मते मिळतील. लाडकी बहीण योजनेमुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्याकडे बघून लोक मतदान करणार आहेत. यावेळी बलाक्षे म्हणाले, मुख्यमंत्री वैद्यकीय मदत पक्षाच्या माध्यमातून रुग्णांना एक कोटी रुपयांचा निधी धनुष्यबाणाला मतदान करणार आहेत. एकनाथ शिंदे यांना पुन्हा मुख्यमंत्री दिग्विजय बागल यांना विधानसभेत पाठवण्यासाठी धनुष्यबाणाला निवडून द्यावे, असे आवाहन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *