करमाळा (सोलापूर) : करमाळा पंचायत समिती शिक्षण विभागच्या वतीने केम येथे झालेल्या तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेत हिवरवाडी शाळेने पाच बक्षिसे मिळवली आहेत. खेळात यशस्वी होण्यासाठी निश्चित धेय्य डोळ्यासमोर ठेवून ते साध्य करण्यासाठी नियमित मेहनत व सराव करत विद्यार्थ्यांनी लहान गट कबड्डी मुले व मुली संघाने तालुकास्तरीय उपविजेता किताब पटकावला तर लंगडी मुले तसेच मुली या संघांनी ही तालुकास्तरीय उपविजेते पद पटकावले. धावण्याच्या स्पर्धेत हिवरवाडी शाळेचा विद्यार्थी श्लोक नानासाहेब पवार याने तृतीय क्रमांक पटकावला.
स्पर्धेत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हिवरवाडीने गुणवत्तेबरोबर कला, क्रीडा स्पर्धेत सुद्धा अत्यंत चुरशिच्या सामान्यात तब्बल पाच बक्षीसे पटकावत चांगले प्रदर्शन दाखवले. कबड्डी मुले : उपविजेता (द्वितीय), लंगडी मुले : उपविजेता (द्वितीय), कबड्डी मुली : उपविजेता (द्वितीय), लंगडी मुली : उपविजेता (द्वितीय), 100 मीटर धावणे.
यशाबद्दल हिवरवाडी शाळेच्या खेळाडूंचे तसेच प्रशालेचे मुख्याध्यापक नितीन व्हटकर, क्रीडा शिक्षक नाना वारे, दिपाली गायकवाड, सुषमा काळे यांचे अभिनंदन गटशिक्षणाधिकारी नलवडे, शिक्षण विस्तार अधिकारी मिनीनाथ टकले, नितीन कदम, केंद्रप्रमुख रमाकांत गटकळ तसेच केतन इरकर, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष भाऊसाहेब पवार, आकाश इरकर, क्रीडाप्रेमी ओंकार पवार, प्रकाश लांडगे, अमोल पवार व ग्रामस्थ यांनी अभिनंदन केले.