करमाळा (सोलापूर) : तालुक्यातील जेऊर येथील मंडळ कृषी अधिकारी कार्यालयाला आंतरराष्ट्रीय मानांकन मिळाले आहे. अत्यंत सुसज्ज व सर्वच बाबतीत उत्कृष्ट अशी या कार्यालयाची रचना आहे. या कार्यालयामध्ये ठेवण्यात आलेले जुने अभिलेख, संपूर्ण मंडळमधील गाववार शेती बद्दलची माहिती येथे ठेवण्यात आली आहे. प्रत्येक बाबीचे नामफलक, स्वच्छता, व्यवस्थित रंगरंगोटी करून पाणी व इतर सर्व सुविधायुक्त असलेले हे कार्यालय आहे.
जेऊर येथील मंडल कृषी अधिकारी कार्यालयाला आयएसओ ९०००१: २०१५ मानांकन मिळाले आहे. मंडळ कृषी अधिकारी मधुकर मारकड यांच्या प्रयत्नाने हे मानांकन मिळाले आहे. या कार्यालयाला शेटफळ येथील जिव्हाळा ग्रुपच्या सदस्यांनी नुकतीच भेट दिली.