पुणे : महायुतीच्या महागोंधळाच्या कारभाराची प्रचिती राज्यातील नागरिकांबरोबर पुणेकरांना येऊ लागली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे प्रशासकीय कामकाजात लक्ष देण्याऐवजी ‘राजकीय धुळवडीत’ अधिक मग्न असून; डॉ. बाबासाहेब आंबेडकर व डॉ. मनमोहनसिंग यांचा काँग्रेसने ‘कथित अवमान (?) करण्याची कथानके’ रचण्याचे निष्फळ प्रयत्न करीत ७५ वर्षां पुर्वीच्या ‘गांधी – नेहरूंच्या नावे बोटे मोडण्याचा राजधर्माचा पुरषार्थ निभावत असल्याची प्रखर टीका काँग्रेस नेते व राज्य प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांनी दिलेल्या प्रसिध्दी पत्रकात केली. 

ते म्हणाले, फडणवीसांनी मुख्यमंत्री पदाचा केवळ राजकीय धुळवडीसाठी वापर करू नये. तर प्रशासकीय कामासाठी देखील वापर करावा व पुणे मनपा’तील २ अतिरिक्त आयुक्त पदांच्या रिक्त जागा त्वरित भराव्यात. एप्रिल २०२४ म्हणजेच तब्बल नऊ महिन्यांपासून ‘पुणे महापालिकेतील’ दोन अतिरिक्त आयुक्तांच्या जागा रिक्त आहेत. त्यामुळे पुणे महापालिकेवर प्रशासक असल्याने, आयुक्त राजेंद्र भोसले यांचेवर कामाचा मोठा ताण आहे. त्यामुळे एकमेव अतिरिक्त अतिरिक्त आयुक्त असलेल्या  पृथ्वीराज बी. पी. यांच्याकडे महापालिकेच्या सर्वच विभागांचा कारभार आहे.

पीएमपीएमएलच्या व्यवस्थापकीय संचालक दीपा मुधोळ मुंडे सध्या मसुरी येथे प्रशिक्षणासाठी गेल्याने ‘पीएमपीएमएलचा अतिरिक्त पदभार’ देखील अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी. पी. यांच्याकडे देण्यात आलेला आहे. दोन अति. आयुक्त नसल्याने, अनेक विभागांच्या फाईल प्रलंबित आहेत. आरोग्य, स्वच्छता, अतिक्रमण विभाग, पाणीपुरवठा व सांडपाणी- ड्रेनेज लाईन सह अनेक अत्यावशक कामे खोळंबून असल्याने नागरिकांना नाहक त्रास सोसावा लागत आहे. महापालिकेतील महत्त्वाची संविधानिक पदे रिक्त ठेवण्यामागे व अधिकारांचे केंद्रीकरण करण्यामागे, काही आर्थिक गणिते आहेत काय (?) वा कोणत्या ॲाफर’ची वाट पाहिली जात आहे काय(?) असा उपहासात्मक सवाल केला. राज्यभरात IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या सुरू आहेत पुण्याची जिल्हाधिकारी देखील बदलले पण पुणे महापालिकेला २ अतिरिक्त आयुक्त काही मिळायला तयार नाहीत. केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी करून देखील पुणे महापालिके’साठी अति आयुक्त मिळत नाहीत ही केवळ नामुष्की समजायची का ‘पुणे शहरास’ (नागपूर मेट्रो प्रमाणे प्राधान्य देणारा पुर्वीचा) आकसच् समजायचा (?) असा संतप्त सवाल ही काँग्रेस प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांनी केला. त्यामुळे किमान पुणे शहराचे खासदार व केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या मागणीस व पर्यायाने पुणेकरांना मुख्यमंत्री फडणवीस यांनी न्याय द्यावा अशी मागणी काँग्रेस नेते व राज्य प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांनी केली.

By kaysangtaa.21

पुणे, मुंबई, पिंपरी चिंचवड, सोलापूर व नगर येथे ‘पुढारी’, ‘प्रभात’ व ‘सकाळ’मध्ये बातमीदार व उपसंपादक म्हणून काम करत पत्रकारितेचा अनुभव घेतल्यानंतर 'काय सांगता' हे न्यूज पोर्टल सुरु करण्यात आले आहे. या पोर्टलवरील प्रत्येक बातमी विश्वसनीय असते. करमाळा येथील बातम्यांसाठी अशोक मुरूमकर संपर्क : ९९२३१७५०२४ कार्यालय पत्ता : डॉ. बाबासाहेब आंबेडकर शॉपिंग सेंटर, गाळा नं. ४७, पेट्रोल पंपाजवळ, जुनी भाजी मंडई, वरचा मजला करमाळा, जि. सोलापूर- ४१३२०३. मेल आयडी : kaysangtaa.21@gmail.com जाहिरातीसाठी संपर्क : ९९२३१७५०२४

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *