करमाळा (सोलापूर) : करमाळा- अहिल्यानगर रस्त्यावर जातेगाव येथील एका हॉटेलमध्ये बेकायदा गोवंश सदृश प्राण्याचे मांस विक्रीप्रकरणी तिघांविरुद्ध करमाळा पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. शाकीर कुरेशी, रहमत मल्लू खान व दीपक काकडे अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयित आरोपींची नावे आहेत. यामध्ये पोलिस तोफीक काझी यांनी फिर्याद दिली आहे.
जातेगाव येथील एका हॉटेलमध्ये बेकायदा गोमांस विक्री होत असल्याची माहिती करमाळा पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर पोलिस निरीक्षक विनोद घुगे व उपपोलिस निरीक्षक एस. डी. चंदनशिवे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली आहे. अलेवर मेवात या हॉटेलच्या किचनमध्ये पोलिसांनी पहाणी केली. तेव्हा एका पिशवीत गोवंश सदृश प्राण्याचे मांस दिसले. त्यानंतर पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. प्रसाद धुमाळ व इतरांसमोर पंचनामा करण्यात आला. याचा पुढील तपास सुरु आहे.