Gold rings and cash worth 3 lakh stolen by breaking the locks and latches of a house in broad daylight in Umrad

करमाळा (सोलापूर) : उमरड येथे भरदिवसा घराची कडी कोयंडा व कुलूप तोडून सोन्याच्या अंगठ्या व रोख अशी ३ लाखाची चोरी झाली आहे. यामध्ये धर्मराज रामा चौधरी (वय ८१, रा. उमरड, ता. करमाळा, जि. सोलापूर) यांच्या फिर्यादीवरून अनोळखी चोरट्यांविरुद्ध करमाळा पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.

चौधरी यांचे एकत्रित कुटुंब आहे. त्यांनी फिर्यादीत म्हटले आहे की, ‘९ जानेवारीला सकाळी ८ वाजता मुलगा धंनजय, नानासाहेब व सुना हे शेतात कामासाठी गेले. तर मी व पत्नी घरी थांबलो होतो. दुपारी ३ वाजता पत्नीचे डोके दुखायला लागल्यानंतर तिला घर बंद करून गावात रुग्णालयात गेलो. रुग्णालयात डॉक्टर नव्हते. त्यामुळे किराणा दुकानातून साहित्य घेऊन ४ वाजता घरी आलो. तेव्हा घराचे कुलूप व कडी तोडलेली दिसली. आतमध्ये पाहिले तर कपाटातील साहित्य अस्ताव्यस्त पडलेले दिसले. कपाट पाहिले तर रोख रक्कम व सोन्याचे दागिने नसल्याचे दिसले’. याबाबत करमाळा पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. याचा तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक पोपट टिळेकर हे करत आहेत. म्हैस विकल्याने एक लाख रोख रक्कम घरात ठेवले होते. त्यासह दागिने चोरटयांनी लंपास केले.

By kaysangtaa.21

पुणे, मुंबई, पिंपरी चिंचवड, सोलापूर व नगर येथे ‘पुढारी’, ‘प्रभात’ व ‘सकाळ’मध्ये बातमीदार व उपसंपादक म्हणून काम करत पत्रकारितेचा अनुभव घेतल्यानंतर 'काय सांगता' हे न्यूज पोर्टल सुरु करण्यात आले आहे. या पोर्टलवरील प्रत्येक बातमी विश्वसनीय असते. करमाळा येथील बातम्यांसाठी अशोक मुरूमकर संपर्क : ९९२३१७५०२४ कार्यालय पत्ता : डॉ. बाबासाहेब आंबेडकर शॉपिंग सेंटर, गाळा नं. ४७, पेट्रोल पंपाजवळ, जुनी भाजी मंडई, वरचा मजला करमाळा, जि. सोलापूर- ४१३२०३. मेल आयडी : kaysangtaa.21@gmail.com जाहिरातीसाठी संपर्क : ९९२३१७५०२४

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *