करमाळा (सोलापूर) : बिटरगाव श्री येथे साधणार चार वर्षांपूर्वी महादेवाच्या मंदिरात नागरिकांना शुद्ध पाणी मिळावे म्हणून गामपंचायतीने आरओ प्लांट बसवला. मात्र या आरओ प्लांटमधून एखादाही नागरिकांना पाणी मिळालेले नाही. मग या कामाचे बिल कसे काढले याची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. भाजपचे जिल्हा सरचिटणीस गणेश चिवटे यांच्या नेतृत्वाखालील ही ग्रामपंचायत असून येथे अनागोंदी कारभार सुरु असून त्यांनीच यामध्ये लक्ष घालावे, अशी मागणी ग्रामस्थांची आहे.
बिटरगाव श्री नागरिकांना शुद्ध पाणी मिळावे म्हणून आरओ प्लांट बसवण्यात आला. हा प्लांट बसवताना स्वतंत्र व्यवस्थाही न करता गैरव्यहावर करत महादेवाच्या मंदिरासमोर असलेल्या सभागृहात बसवण्यात आला. मात्र नागरिकांना शुद्ध पाणी मिळणार या अपेक्षेने कोणीही तक्रार केली नाही. मात्र चार वर्ष झाले तरी पाणी मिळालेले नाही. या प्लॅन्टमधील मशीन देखील खोक्याच्या बाहेर काढण्यात आलेली नाही. मग याचे बिल काढले आहे की नाही? बिल काढले असेल तर काम पूर्ण न होता बील कसे काढले याची चौकशी करणे गरजेचे आहे. या कामाची चौकशी करून बोगस बिल काढले असेल तर संबंधितांवर कारवाई, करावी अशी मागणी आहे. अन्यथा २६ जानेवारीला आंदोलन केले जाईल, असा इशारा गटविकास अधिकारी यांना निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.