करमाळा (सोलापूर) : करमाळा येथील श्री कमलादेवी चरणी एका भक्ताने अंदाजे दोन लाख किंमतीचा सोन्याचा गजरा अर्पण केला आहे. शुक्रवारी महापूजा, भोगी करून हा गजरा अर्पण केला आहे. संबंधित भक्ताने नाव न जाहीर करण्याच्या इच्छेनुसार हा सोन्याचा गजरा कमलादेवी चरणी अर्पण केला आहे. यावेळी पुजारी बापू पुजारी, दादासाहेब पुजारी, तुषार सोरटे, सहदेव सोरटे, पुरोहित कन्हैयालाल पुराणिक, पद्माकर सूर्यपुजारी, रोहित पुजारी, लक्ष्मण हवलदार, व्यवस्थापक अशोक गाठे आदी उपस्थित होते.
श्री कमलादेवीला दोन लाखाचा सोन्याचा गजरा अर्पण
