करमाळा (सोलापूर) : महात्मा गांधी इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये फूड फेस्टिवल झाले. याचा आनंद विद्यार्थ्यासह पालकांनीही घेतला. फूड फेस्टिवलमध्ये सर्व विद्यार्थ्यांनी चविष्ट पदार्थ बनवून आणले होते. इडली- सांबर, वडापाव, समोसा, भेळ, पाव- भाजी, चना- चाट, पॉपकॉर्न, ब्रेड कटलेट, चॉकलेट केक, खारीमोरी, ढाळा, कणीस, थालीपीठ, मिरची व कांदाभजी, बॉबी, चना, कुरकुरे, चिप्स, बिस्किट, चॉकलेट स्टिक, चकली, गाजर हलवा, शाबुवडे आदी चटकदार खाद्यपदार्थ बनवून आणले होते.
या खाद्यपदार्थाच्या स्टॉल्सची मांडणी त्यांनी आणलेल्या खाद्यपदार्थाची विक्री व खरेदी तसेच विविध पदार्थांचा आस्वाद घेण्याचा आनंद विद्यार्थ्यांनी लुटला. विद्यार्थ्यांना लहान वयात व्यवहार ज्ञानाचे शिक्षण, गणनक्रिया विकसित करण्यासाठी तसेच शिकण्याचा उत्साह टिकून ठेवण्यासाठी या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याला विद्यार्थ्यांनी व पालकांनी त्याचबरोबर शिक्षकांनी मोठा प्रतिसाद देत या फेस्टिवलमध्ये सहभाग घेतला होता. अशा उपक्रमातून विद्यार्थ्यांमधील आत्मविश्वास, आत्मनिर्भरता, योग्यता, सहनशीलता, नेतृत्व, शारीरिक वाढ या सर्वांचा विकास हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश होता. या फूड फेस्टिवलचे उद्घाटन उप प्राचार्य अनिस बागवान व पर्यवेक्षक रमेश भोसले यांनी केले.