करमाळा (सोलापूर) : उत्तराखंडमध्ये झालेल्या 38 व्या राष्ट्रीय कुस्ती स्पर्धत यशवंतराव चव्हाण महाविद्यालयमधील विद्यार्थिनी आश्लेषा बागडेने यश संपादन केले आहे. तिने राष्ट्रीय पातळीवर तिसरा क्रमांक मिळवत ब्रॉंझ मेडल पटकावले. आश्लेषाने स्पर्धेमध्ये उत्तम कामगिरी करत आपल्या लौकिकाला साजेल असा खेळ केला. सेमी फायनलमध्ये तिने हरत असलेली कुस्ती अत्यंत कुशलतेने खेळून दमदार विजयात रुपांतर केले.
महाविद्यालयाचे शारीरिक शिक्षण शिक्षक प्रा. राम काळे यांचे मार्गदर्शन लाभले. या दंगल गर्लने महाविद्यालयाचे तसेच महाराष्ट्राचे नाव राष्ट्रीय पातळीवर झळकावले आहे. अशा अतिशय महत्वाच्या कामगिरीबद्दल विद्या विकास मंडळाचे सचिव विलासराव घुमरे, संस्थेचे अध्यक्ष प्राचार्य मिलिंद फंड, संस्थेचे सहसचिव विक्रमसिंह सुर्यवंशी, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एल. बी. पाटील, वरिष्ठ विभागाचे उपप्राचार्य डॉ. अनिल साळुंखे, कनिष्ठ विभागाचे उपप्राचार्य संभाजी किर्दाक यांनी अभिनंदन केले.