कामोणेत महिला आरोग्य शिबिर व पोषण आहार प्रशिक्षण कार्यशाळा

करमाळा (सोलापूर) : कामोणे येथे महिलांच्या आरोग्य व पोषणाबाबत जनजागृती करण्यासाठी अझीम प्रेमजी फाउंडेशन, सेफ वॉटर नेटवर्क व ग्रामपंचायतच्या वतीने महिला आरोग्य शिबिर व पोषण आहार प्रशिक्षण झाले. पाणलोट विकास समितीचे अध्यक्ष विकास कांबळे, ग्रामपंचायत सदस्य पंकज नलवडे यावेळी उपस्थित होते. डॉ. वायकर, प्रकल्प समन्वयक विक्रम पवार, आशा सेविका राणी भालेराव यांनी यावेळी मार्गदर्शन केले. या शिबिरात महिलांना स्वच्छता, पोषण आहार, महिला आरोग्याविषयी माहिती देण्यात आली. गावातील 50 पेक्षा जास्त महिलांनी शिबिराचा लाभ घेतला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *