करमाळा (सोलापूर) : मध्य रेल्वेच्या पोल क्रमांक ३३३/३९ ते पोल क्रमांक ३३३/४१ च्या दरम्यान अंदाजे २० वर्षाच्या तरुणाचा रेल्वेतून पडून मृत्यू झाला आहे. याबाबत करमाळा पोलिसात आकस्मित मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे. संबंधित तरुणाची ओळख पटली नसल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. याबाबत पोलिस निरीक्षक विनोद घुगे व सहाय्यक पोलिस निरीक्षक पोपट टिळेकर यांना संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. सोमवारी (ता. २४) मध्यरात्री पावणेएक वाजताच्या सुमारास ही घटना घडली आहे. याचा पुढील तपास सुरु आहे.
रेल्वेतून पडून तरुणाचा मृत्यू, करमाळा पोलिसात नोंद
