सोलापूर : केंद्रीय रस्ते वाहतुक विभागाने हिट ॲन्ड रन केसेस मध्ये मयत किंवा जखमींच्या वारसांना व नातेवाईकांना तातडीची नुकसान भरपाई मिळण्यासाठी नविन नुकसान योजना कार्यान्वीत केली आहे. अपघात झाले पासून 15 दिवसाचे आत जखमींचे नातेवाईकांना 50 हजार व मयताचे नातेवाईकांना 2 लाख रुपये तातडीची मदत मिळणार असल्याची माहिती सोलापूर ग्रामीण वाहतूक चे पोलीस निरीक्षक अशोक सायकर यांनी दिली आहे.
ही मदत मिळण्यासाठी गुन्हा दाखल झालेनंतर एफ. आय. आर, पोस्टमार्टम रिपोर्ट किंवा जखमींचे वैदयकिय प्रमाणपत्र व इतर आवश्यक कागदपत्रे तात्काळ नव्याने स्थापन होत असलेल्या जिल्हास्तरिय समितीकडे सादर करावयाची असून ही समिती प्रमुख क्लेम दावा चौकशी अधिकारी, पोलिस अधिकारी किंवा उपप्रादेशिक परिवहन अधिकारी रस्ता, सुरक्षा समितीचे लोकप्रतिनिधी व विमा महामंडळाचे प्रतिनिधी हे असून सदरची समिती ही राज्य शासनाकडून स्थापन करण्यात येत आहे. तरी यापुढे जखमींचे व मयताचे नातेवाईक यांनी उपरोक्त योजनेतून मदत मिळण्यासाठी या समितीकडे प्रस्ताव सादर करावेत, असेही सायकर यांनी कळविले आहे.