करमाळा (अशोक मुरूमकर) : तालुक्यातील श्री आदिनाथ सहकारी साखर कारखान्याची निवडणूक जाहीर झाली असून निवडणूक लढण्याबाबत माजी आमदार संजयमामा शिंदे समर्थकांची आज (सोमवारी) करमाळ्यात विचारविनिमय बैठक झाली. या बैठकीला करमाळा तालुक्यातील कार्यकर्त्यांसह आदिनाथच्या कार्यक्षेत्रातील जामखेड तालुक्यातलही कार्यकर्ते उपस्थित होते. यामध्ये निवडणूक लढण्याबाबत निर्णय झाला असून ‘युती- आघाडी करायची की कसे हे नंतर पाहू’ पण सर्व इच्छुकांनी अर्ज दाखल करावेत. ‘महायुतीतील घटक पक्षांना बरोबर घेऊन आपण ही निवडणूक लढवणार आहोत. यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी चर्चा करणार’ असल्याचे आमदार शिंदे यांनी स्पष्ट केले आहे.

माजी आमदार शिंदे म्हणाले, ‘आदिनाथ कारखाना ही करमाळा तालुक्याची अस्मिता आहे. हा कारखाना कसा अडचणीत आला यावर चर्चा करण्यापेक्षा आपण हा कारखाना कसा चांगला चालवू यावर भर दिला जाईल. सभासदांनी आपल्या ताब्यात हा कारखाना दिला तर कारखाना क्षेत्रातील आपला अनुभव व कौशल्याच्या जोरावर हा कारखाना सरकारची मदत घेऊन चालवू,’ असे त्यांनी स्पष्ट केले.

पुढे बोलताना ते म्हणाले, ‘विधानसभा निवडणूक झाल्यापासून शिंदे गटाबाबत काहीजण चुकीची माहिती पसरवत आहेत. काहीही झाले तरी मी करमाळ्याला विसरणार नाही. मतदारसंघातील ३६ गावे येत्या काळात वगळण्यात आली तरी मी करमाळा मतदार सोडणार नाही. करमाळा हीच माझी कर्मभूमी आहे आणि या मतदारसंघावर माझे प्रेम आहे. त्यामुळे असे गैरसमज पसरवणाऱ्यांकडे दुर्लक्ष करा’, असे म्हणत त्यांनी अपवा पसरवणाऱ्याला टोला लगावला आहे. ‘करमाळा तालुक्यात मला विधानसभा निवडणुकीत दोन नंबरची मते आहेत. याची जाण आहे. माझ्या काळात विकास कामे करण्यावर मी भर दिला. येणाऱ्या काळातही माझे काम सुरूच राहणार आहे. कार्यकर्त्यांना बळ देण्यासाठी आपण येणाऱ्या काळातील सर्व निवडणुका उपमुख्यमंत्री पवार यांच्या मार्गदर्शनाखाली लढणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

आमदार रोहित पवार यांच्या केसचा उल्लेख
माजी आमदार शिंदे यांनी कार्यकर्त्यांची मनोगते व्यक्त झाल्यानंतर मनोगत व्यक्त केले. त्यामध्ये त्यांनी बारामती ऍग्रोचे अध्यक्ष रोहित पवार यांच्या केसचा उल्लेख केला. त्यावर आपण चर्चा करू असे म्हटले. यावेळी सामाजिक कार्यकर्ते अण्णा पवार, चंद्रकांत सरडे, सुहास गलांडे आदींनी मनोगत व्यक्त केले.

By kaysangtaa.21

पुणे, मुंबई, पिंपरी चिंचवड, सोलापूर व नगर येथे ‘पुढारी’, ‘प्रभात’ व ‘सकाळ’मध्ये बातमीदार व उपसंपादक म्हणून काम करत पत्रकारितेचा अनुभव घेतल्यानंतर 'काय सांगता' हे न्यूज पोर्टल सुरु करण्यात आले आहे. या पोर्टलवरील प्रत्येक बातमी विश्वसनीय असते. करमाळा येथील बातम्यांसाठी अशोक मुरूमकर संपर्क : ९९२३१७५०२४ कार्यालय पत्ता : डॉ. बाबासाहेब आंबेडकर शॉपिंग सेंटर, गाळा नं. ४७, पेट्रोल पंपाजवळ, जुनी भाजी मंडई, वरचा मजला करमाळा, जि. सोलापूर- ४१३२०३. मेल आयडी : kaysangtaa.21@gmail.com जाहिरातीसाठी संपर्क : ९९२३१७५०२४

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *