करमाळा (अशोक मुरूमकर) : तालुक्यातील श्री आदिनाथ सहकारी साखर कारखान्याचे २१ संचालक निवडीसाठी गुरुवारी (ता. १७) मतदान होणार आहे. यासाठी ६२ उमेदवार रिंगणात आहेत. त्यांना आज (गुरुवारी) चिन्ह वाटप झाले आहे. सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी शिल्पा ठोकडे यांच्या मार्गदर्शनाखाली तहसील कार्यालय येथे हे चिन्ह वाटप झाले.
आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत आमदार नारायण पाटील (आबा), माजी आमदार संजयमामा शिंदे व प्रा. रामदास झोळ यांच्या नेतृत्वाखाली तीन पॅनल झाले आहेत. पाटील यांच्या पॅनलमध्ये जेऊर गटातून श्रीमंत चौधरी, महादेव पोरे व दत्तात्रय गव्हाणे. सालसे गटातून रविकिरण फुके, दशरथ हजारे व आबासाहेब अंबारे. पोमलवाडी गटातून किरण कवडे, नवनाथ झोळ व संतोष खाटमोडे पाटील. केम गटातून दत्तात्रय देशमुख, विजयसिंह नवले व महेंद्र पाटील. रावगाव गटातून देवानंद बागल, ऍड. राहुल सावंत व डाॅ. अमोल घाडगे. उत्पादक सहकारी संस्था, बिगर उत्पादक संस्था व पणन संस्था प्रतिनिधी गटातून डॉ. हरिदास केवारे. अनुचित जाती व अनुसूचित जमाती प्रतिनिधी गटातून राजाभाऊ कदम. महिला राखीव प्रतिनिधी गटातून राधिका तळेकर व उर्मीला सरडे. इतर मागासवर्ग प्रतिनिधी गटातून दादासाहेब पाटील. भटक्या विमुक्त जाती व जमाती विशेष मागास प्रवर्ग गटातून आमदार नारायण पाटील हे उमेदवार आहेत. त्यांना कपबशी हे चिन्ह मिळाले आहे.
माजी आमदार संजयमामा शिंदे यांच्या नेतृत्वाखालील पॅनलमध्ये जेऊर गटातून चंद्रकांत सरडे, प्रशांत पाटील व प्रमोद बदे. सालसे गटातून विलास जगदाळे, नागनाथ चिवटे व नवनाथ जगदाळे. पोमलवाडी गटातून दशरथ पाटील, बबन जाधव व ऍड. नितीनराजे भोसले. केम गटातून माजी आमदार संजयमामा शिंदे, सोमनाथ देशमुख व सोमनाथ रोकडे. रावगाव गटातून अभिजित जाधव पाटील, आशिष गायकवाड व विनय ननवरे. उत्पादक सहकारी संस्था, बिगर उत्पादक संस्था व पणन संस्था प्रतिनिधी गटातून सुजित बागल. अनुचित जाती व अनुसूचित जमाती प्रतिनिधी गटातून बाळकृष्ण सोनवणे. महिला राखीव प्रतिनिधी गटातून मंदा सरडे व शालन गोंडंगिरे. इतर मागासवर्ग प्रतिनिधी गटातून रोहिदास माळी. भटक्या विमुक्त जाती व जमाती विशेष मागास प्रवर्ग गटातून अनिल केकाण हे उमेदवार आहेत. त्यांना पतंग हे चिन्ह मिळाले आहे.
प्रा. रामदास झोळ यांच्या नेतृत्वाखालील पॅनलमध्ये जेऊर गटातून दत्तात्रय कामटे, शांतीलाल जाधव व रवींद्र गोडगे. सालसे गटातून अण्णासाहेब देवकर, दत्तात्रय जगदाळे व भारत सरडे. पोमलवाडी गटातून प्रा. रामदास झोळ, भरत जगताप व प्रकाश गिरंजे. केम गटातून सुधीर साळुंखे व बापूराव तळेकर. रावगाव गटातून कल्याण पाटील, सुभाष शिंदे व हरिभाऊ झिंजाडे. उत्पादक सहकारी संस्था, बिगर उत्पादक संस्था व पणन संस्था प्रतिनिधी गटातून दशरथ कांबळे
अनुचित जाती व अनुसूचित जमाती प्रतिनिधी गटातून दशरथ कांबळे. महिला राखीव प्रतिनिधी गटातून इंदुबाई नाईकनवरे व रत्नमाला मंगवडे. इतर मागासवर्ग प्रतिनिधी गटातून रवींद्र गोडगे. भटक्या विमुक्त जाती व जमाती विशेष मागास प्रवर्ग गटातून रामचंद्र खाडे हे उमेदवार आहेत. त्यांना शिट्टी हे चिन्ह मिळाले आहे.