करमाळा (सोलापूर) : संताजीनगर येथील भाजप संपर्क कार्यालयात ध्वजारोहण करत 45 वर्धापन दिन साजरा झाला. भाजपच्या जेष्ठ सदस्या आनंदी पाटील व प्रदीप देवी यांचा यावेळी सन्मान झाला. करमाळा शहरचे माजी अध्यक्ष संजय घोरपडे, जिल्हा उपाध्यक्ष शशिकांत पवार, किसान मोर्चा जिल्हा सरचिटणीस नरेंद्र ठाकूर, प्रज्ञा सेलचे जिल्हाध्यक्ष सुहास घोलप, शहर सरचिटणीस जितेश कटारिया, सचिन चव्हाण, संतोष कांबळे, बाळासाहेब कुंभार, महिला अध्यक्ष रेणुका राऊत, शिवाजी कुंभार आदी यावेळी उपस्थित होते.
करमाळ्यात भाजपच्या 45 व्या वर्धापन दिनानिमित्त जेष्ठ सदस्यांचा सन्मान
