करमाळा (सोलापूर) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी भाजपचे उमेदवार खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना विजयी करावे, असे आवाहन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले आहे. महायुतीमधील भाजप, शिवसेना शिंदे गट, राष्ट्रवादी अजित पवार गट, आरपीआय आठवले गट, रासप, रयत क्रांती व मित्र पक्षांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. या बैठकीत पालकमंत्री पाटील बोलत होते.

भाजपचे जिल्हा सरचिटणीस तथा जिल्हा नियोजन समितीचे सदस्य गणेश चिवटे, आमदार संजयमामा शिंदे, माजी आमदार प्रशांत परिचारक, जिल्हाध्यक्ष दीपकआबा साळुंखे, आदिनाथचे प्रशासकीय संचालक विलासराव घुमरे, भाजपचे जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार, युवा मोर्चाचे शंभूराजे जगताप, महिला आघाडीच्या प्रदेशउपाध्यक्षा रश्मी बागल, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख महेश चिवटे, रयत क्रांती शेतकरी संघटनेचे अजय बागल, आरपीआयचे अर्जुनराव गाडे यांच्यासह प्रमुख पदाधिकाऱ्यांची भाषणे झाली.

Discussion in the political circles on Mohite Patil entry into the Madha Lok Sabha constituency

यावेळी राजकुमार पाटील, बबनराव मुरूमकर, सचिन शिंदे, महेश साठे, भरत आवताडे, कन्हैयालाल देवी, जयकुमार शिंदे, सुजित बागल, भगवानगिरी गोसावी, दिनेश भांडवलकर, प्रवीण जाधव, रामभाऊ ढाणे, अफसर जाधव, जगदीश अग्रवाल, काकासाहेब सरडे, उमेश पाटील, मोहन डांगरे, नितीन झिंजाडे, अंगद देवकते, संजय शिलवंत, सुहास घोलप, दीपक चव्हाण, अभिषेक आव्हाड, राहुल कानगुडे, ओंकार बसवंती, संतोष वारगड, ज्योती शिंदे, पूजा माने आदी उपस्थित होते.

By kaysangtaa.21

पुणे, मुंबई, पिंपरी चिंचवड, सोलापूर व नगर येथे ‘पुढारी’, ‘प्रभात’ व ‘सकाळ’मध्ये बातमीदार व उपसंपादक म्हणून काम करत पत्रकारितेचा अनुभव घेतल्यानंतर 'काय सांगता' हे न्यूज पोर्टल सुरु करण्यात आले आहे. या पोर्टलवरील प्रत्येक बातमी विश्वसनीय असते. करमाळा येथील बातम्यांसाठी अशोक मुरूमकर संपर्क : ९९२३१७५०२४ कार्यालय पत्ता : डॉ. बाबासाहेब आंबेडकर शॉपिंग सेंटर, गाळा नं. ४७, पेट्रोल पंपाजवळ, जुनी भाजी मंडई, वरचा मजला करमाळा, जि. सोलापूर- ४१३२०३. मेल आयडी : kaysangtaa.21@gmail.com जाहिरातीसाठी संपर्क : ९९२३१७५०२४

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *