करमाळा (सोलापूर) : श्री आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीची रणधुमाळी उठली आहे. अनेक आरोप- प्रत्यारोप होत आहेत. मात्र या आधी तालुक्यातील प्रत्येक नेत्याने कारखान्यावर आपली सत्ता स्थापना केली. पण एकालाही सभासद, शेतकरी आणि कारखाना यांना न्याय देता आला नाही. एखादी संस्था, कारखाना चालवण्यासाठी अनुभव आणि त्या- त्या परिस्थितीनुसार निर्णय घेण्याची क्षमता लागते आणि ती माजी आमदार संजयमामा शिंदे यांच्याकडे आहे. त्यांच्या कामाचा परिचय तालुक्याला पाच वर्षात आलेला आहे. त्यामुळे आता लोकांनी डोळसपने या निवडणुकीकडे बघावं, मागील विधानसभावेळी झालेली चूक सुधारून घ्यावी, असे मत राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष राजकुमार देशमुख यांनी केले.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी करमाळ्यात आल्यानंतर संजयमामाला निवडून द्या कारखाना जागेवर आणतो कारण दादा मामाचे सलोख्याचे संबधं सगळ्यांना माहित आहेत आणि याच गोष्टीचा फायदा कारखाना पूर्वपदावर आणायला होणार आहे. त्यामुळे मामांच्या नेतृत्वाखाली महायुतीच्या आदिनाथ बचाव पॅनलला निवडून आणण्याचे आवाहन राजकुमार देशमुख यांनी केले आहे.