करमाळा (सोलापूर) : जिल्हा नियोजन समितीचे सदस्य गणेश चिवटे यांच्या वाढदिवसानिमित्त बिटरगाव श्री येथे गुरुवारपासून (ता. २६) सोमवारपर्यंत (ता. ३०) किर्तन महोत्सव होणार आहे. यामध्ये हभप किर्तनकेसरी अक्रूर महाराज साखरे, हभप भागवताचार्य संदीप महाराज खंडागळे, हभप पुरुषोत्तम महाराज पाटील, हभप निवृत्तीनाथ महाराज देशमुख (इंदोरीकर) व हभप महंत विठ्ठल महाराज शास्त्री यांचे किर्तन होणार आहे. बिटरगाव श्री येथे होणाऱ्या या किर्तन महोत्सवात रविवारी (ता. २९) हभप निवृत्तीनाथ महाराज देशमुख (इंदोरीकर) यांचे किर्तन होणार आहे, अशी माहिती बिटरगाव श्री चे सरपंच डॉ. अभिजित मुरूमकर यांनी दिली आहे.
या किर्तन महोत्सवात व्यासपीठ चालक म्हणून मृदूंगाचार्य नाना पठाडे हे असणार आहेत. मकाईचे अध्यक्ष दिनेश भांडवलकर, करंजेचे सरपंच काका सरडे व चंद्रकांत काळे यांच्या हस्ते दीपपूजन होणार आहे. कलश पूजन कामोणेचे माजी सरपंच रमेश पाटील व आळजापूरचे सरपंच संजय रोडे यांच्या हस्ते होणार आहे. विनापूजन शंकर पाटील व नंदकुमार दळवी यांच्या हस्ते होणार आहे. प्रतिमापूजन मोहन शिंदे व बळीराम शिंदे यांच्या हस्ते होणार आहे. ग्रंथपूजन सुजित बागल व कांतीलाल वाघमोडे यांच्या हस्ते होणार आहे. मृदंगपूजन हंबीरराव मुरूमकर व हरिशचंद्र झिंजाडे, ध्वजपूजन उपसरपंच अभिजित पाटील व वंदन नलवडे व टाळपूजन हरिभाऊ झिंजाडे व चंद्रकांत चुंबळकर यांच्या हस्ते होणार आहे.