उजनी बॅकवाॅटरवरील कुगाव- इंदापूर पुलाचे काम वेगात सुरू

Work on Kugaon to Indapur bridge on Ujani backwaters is progressing at a fast pace

करमाळा (सोलापूर) : उजनी बॅकवॊटवरील कुगाव ते इंदापूर पुलाचे काम वेगात सुरु आहे. भीमा नदीच्या पात्राने कुगावला तिन्ही बाजूला वेढले आहे. कुगावच्या नदी पात्रासमोर सात गावांचे क्षेत्र आहे. सोगाव, वाशिंबे (करमाळा), गंगावळण, कळाशी, कालठण, शिरसोडी, पडस्थळ (इंदापूर) या गावांचा समावेश आहे.

कुगाव ते इंदापूर पुलामुळे १२० किलोमीटरचा वळसा थांबणार आहे. जलमार्गाने जाण्यासाठी सरकारने चार मार्ग मंजूर आहेत पण शासकीय बोटी किंवा जलथांबे अशा कोणत्याही प्रकारचा सोयी सुविधा सरकारने उपलब्ध करून दिल्या नव्हत्या. त्यामुळे नागरिकांना जीव मुठीत घेऊन खाजगी नौकांचीच मदत घ्यावी लागत होती. काही दिवसांपूर्वी एक बोट उलटून दुर्घटना घडली होती.

कुगाव ते इंदापूर पूलाच्या कामासाठी स्थानिक नागरिकांसह इंदापूर शहरातील व्यापाऱ्यांनी पाठपुरावा केला होता. मंत्री दत्तात्रय भरणे व माजी आमदार संजयमामा शिंदे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या माध्यमातून निधी उपलब्ध करून दिला होता. या पुलाचे काम वेगात सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *