करमाळा (सोलापूर) : केडगाव येथे एसटी स्टॅण्डवर किराणा आणण्यासाठी गेलेल्या एकाला मारहाण झाली आहे. याप्रकरणात चौघांविरुद्ध करमाळा पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. चैन्या भामट्या भोसले, मौल्या निळकंठ्या काळे (रा. डाकू निमगाव, ता. कर्जत, जि. नगर), बाप्या राजा काळे व राजा किड्या काळे (रा. केडगाव, ता. करमाळा, जि. सोलापूर) अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयित आरोपींची नावे आहेत. यामध्ये शंकर पवण्या काळे (रा. केडगाव) यांनी फिर्याद दिली आहे. त्यावरून हा गुन्हा दाखल झाला आहे. यातील जखमींवर सोलापूर येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय येथे उपचार सुरु आहेत. ११ तारखेला हा प्रकार झाला होता.


