करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीत स्वनिधीतून रस्त्याच्या कॉंक्रिटीकरणाचा शुभारंभ

करमाळा (सोलापूर) : करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीत स्वनिधीतून रस्त्याच्या कॉंक्रिटीकरणाचे काम सुरु झाले आहे. शेतकऱ्यांना सोयी- सुविधा देण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याची ग्वाही या कामाच्या भूमिपूजनावेळी सभापती माजी आमदार जयवंतराव जगताप यांनी दिली.

करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पूर्व यार्डमध्ये हे काम सुरु झाले. सहाय्यक निबंधक सहकारी संस्था अनिकेत शिंदे यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. माजी आमदार जगताप म्हणाले, ‘शेतकऱ्यांसाठी कै. नामदेवराव जगताप व कै. अण्णासाहेब जगताप यांनी करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीची स्थापना केली. शेतकरी व व्यापाऱ्यांना सुविधा देण्यासाठी उत्पन्न वाढ गरजेची होती. त्यासाठी आम्ही शॉपिंग कॉम्प्लेक्स व गोदामांची उभारणी केली. यातून सुशिक्षित बेरोजगारांना रोजगाराची संधी उपलब्ध झाली. बाजार समितीचे सध्याचे उत्पन्न तीन कोटीच्या दरम्यान आहे. त्यामुळे बँका अथवा वित्तीय संस्थांकडून कोणत्याही प्रकारचे कर्ज न घेता स्वनिधीतून मूलभूत सुविधांसाठी विकास कामे करणे शक्य झाले आहे.’

पुढे बोलताना ते म्हणाले, ‘पदाधिकारी, शेतकरी, व्यापारी, हमाल- तोलार यांच्या समन्वयातून बाजार समितीत उत्कृष्ट काम सुरु आहे. येणाऱ्या आगामी काळात उर्वरित भागातील रस्ते कॉंक्रिटीकरण, जनावरांचा बाजार सुरू करणे यासह शेतकरी हिताच्या दृष्टीने विकास कामे हाती घेणार’ असल्याचे माजी आमदार जगताप यांनी सांगितले.

गट सचिवांचे नेते बबनराव मेहेर, सामाजिक कार्यकर्ते श्रेणिकशेठ खाटेर, माजी उपनगराध्यक्ष दादासाहेब सावंत, बाजार समितीचे संचालक जनार्धन नलवडे, सागर दौंड, तात्यासाहेब शिंदे, नागनाथ लकडे, महादेव कामटे, वालचंद रोडगे, रामदास गुंडगिरे, शिवाजी राखुंडे, बाळासाहेब देवकर, परेश दोशी, विक्रांत मंडलेचा, मयूर दोशी, विजयकुमार दोशी, सुनील मेहता, अनुप दोशी, अनिल सोळंकी, प्रीतम लुंकड, नवनाथ सोरटे, संतोष गुगळे, संतोष कुकडे, प्रमोद गायकवाड, संजय गायकवाड, महादेव डुबल, दादासाहेब लबडे, शहाजी शिंगटे, अभयसिंह आवटे, अनिल सुरवसे, लक्ष्मण थोरात, दादासाहेब पुजारी, दादासाहेब सरडे, आनंद शिंदे, ॲड. नवनाथ राखुंडे, विकास आमृळे, अमोल परदेशी, झनकसिंग परदेशी, ज्योतीराम ढाणे, संतोष गुगळे, सचिव विठ्ठल क्षिरसागर आदी उपस्थित होते. प्रस्ताविक युसुफ शेख यांनी तर आभार दत्तात्रय शिर्के यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *