मुंबई : मुंबईत उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भवितव्य ठरवणारी अजित पवार यांच्या गटाची अतिशय महत्वाची बैठक सुरु आहे. या बैठकीला ३२ आमदार उपस्थित असल्याची माहिती मिळत आहे. या सभेत मंत्री छगन भुजबळ यांनी जोरदार भाषण केले आहे. ‘पवार साहेब आमचे विठ्ठल आहेत. पण आमच्या विठ्ठलाला बडव्यांनी घेरलंय’ असे ते म्हणाले आहेत.
मी देखील बाळासाहेब ठाकरे यांना सोडून तुमच्याकडे आलो होतो. त्यांनाही किती वेदना झाल्या असतील, असे सांगतानाच ते म्हणाले वसंतदादा पाटील यांना सोडून तुम्हीही आला होतात. त्यांनाही किती त्रास झाला असेल असे अनेक दाखले यावेळी त्यांनी दिले आहेत. तुम्ही आमचे विठ्ठल आहात. आम्हाला आशीर्वाद द्या, असे ते म्हणाले आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील बंडांनंतर आज मुंबईतील दोन वेगवेलगल्या ठिकाणी अजित पवार गटाचे आणि शरद पवार गटाचे मेळावे होत आहेत. आतपर्यंत अजित पवार गटाकडे ३२ आमदार असल्याचा दावा करण्यात येतोय तर दुसरीकडे शरद पवार यांच्या गटाकडे १६ आमदार असल्याचा दावा केला जात आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील बंडांनंतर आज मुंबईतील दोन वेगवेलगल्या ठिकाणी अजित पवार गटाचे आणि शरद पवार गटाचे मेळावे होत आहेत.
अजित पवार, दिलीप वळसे पाटील, छगन भूजबळ, संग्राम जगताप, बबनदादा शिंदे, सुनिल टिंगोरे, दिलीप मोहिते, माणिकराव कोकाटे, दत्तात्रय भरणे, अदिती तटकरे, यशवंत माने, प्रफुल पटेल, रुपाली चाकणकर, धनंजय मुंडे, सुनील शेळके, निलेश लंके, उमेश पाटील आदी यावेळी उपस्थित आहेत. (उपस्थित आमदारांची संख्या वाढू शकते. बैठक अजून सुरु आहे.)