नामदेवराव जगताप ऊर्दू शाळेत विद्यार्थीचे स्वागत

करमाळा (सोलापूर) : शाळेच्या आज (सोमवार) पहिल्या दिवशी नामदेवराव जगताप उर्दु शाळेत विद्यार्थीचे स्वागत करण्यात आले. माजी नगरसेवक संजय सावंत, माजी नगरसेवक फारुक जमादार, रविंद्र कांबळे, दीपक सुपेकर, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मजहर नालबंद, मुख्याध्यापक जुबेर जनवाडकर आदींनी गुलाब पुष्प देऊन विद्यार्थ्यांचे स्वागत केले.

नामदेवराव जगताप ऊर्दू शाळेत पहिली ते दहावीपर्यंतचे वर्ग आहेत. यावर्षी दहावीची पहिली बॅच बाहेर पडली असून दहावीचा निकाल १०० टक्के लागला होता. प्रशासन अधिकारी अनिल बनसोडे, लिपिक शिवदास कोकाटे आदींसह शिक्षक व पालक यावेळी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *