Awarded to women by Sarpanch Mote on the occasion of Punyashlok Ahilya Devi Holkar Jayanti at Pathurdi

करमाळा : तालुक्यातील पाथुर्डी येथे सरपंच रुक्मिणी मोटे यांच्या हस्ते पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून जयंती साजरी करण्यात आली. यावेळी पाथुर्डी ग्रामपंचायत मार्फत महिला व बालविकास क्षेत्रामध्ये उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल सरपंच रुक्मिणी मोटे यांच्या हस्ते वर्षाराणी मोटे व सुमन नाळे यांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.या कार्यक्रमावेळी पत्रकार शितलकुमार मोटे,मुख्याध्यापक महेश कांबळे,ग्रामसेवक महेश काळे,वर्षाराणी मोटे, सुमनताई नाळे यांनी मनोगत व्यक्त केले तर सरपंच रुक्मिणी मोटे यांनी उपस्थितांचे आभार मानले.

यावेळी पुरस्कार मिळालेल्या वर्षाराणी मोटे व सुमन नाळे यांनी मिळालेली पुरस्काराची रक्कम जिल्हा परिषद शाळेतील मुलांच्या खर्चासाठी देण्यात आली.सरपंच रुक्मिणी मोटे,उपसरपंच प्रकाश खरात, ग्रामसेवक महेश काळे,ग्रामपंचायत सदस्या आशा तोडेकर, अश्विनी मोटे,सुनंदा मोटे,सचिन चांगण, चांगदेव कानडे,विकास मोटे,विविध कार्यकारी संस्थेचे संचालक चांगदेव मोटे,तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष शितलकुमार मोटे,

धनंजय मोटे, शिवाजी पाडुळे, ग्रामपंचायत शिपाई दिपक मोटे, विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन वैजीनाथ मोटे,अतुल मोटे, अनिकेत मोटे,राहुल मोटे,दादा लगस,बंटी मोटे,अकुंश दरगुडे, सुरेश मोटे, किरण मोटे,समाधान मोटे,सदाशिव तोडेकर, चेअरमन संतोष मोटे, दादा जानकर, नाना मोटे,सौरभ मोटे, गोकुळ मोटे,अंगणवाडी सेविका पुष्पा कोरे, आशा स्वयंसेविका भागूबाई हुलगे, दिपाली खरात,सुनीता गोरे, शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा मीनाताई मोटे, मीराबाई जानकर, विलास खरात, सचिन मोटे, मुख्यध्यापक महेश कांबळे,अप्पा मोटे,कल्याण जानकर,नाना कांबळे,नागनाथ कोरे,जिल्हा परिषदेतील विद्यार्थी व विदयार्थीनी व ग्रामस्थ उपस्थित होते.

By kaysangtaa.21

पुणे, मुंबई, पिंपरी चिंचवड, सोलापूर व नगर येथे ‘पुढारी’, ‘प्रभात’ व ‘सकाळ’मध्ये बातमीदार व उपसंपादक म्हणून काम करत पत्रकारितेचा अनुभव घेतल्यानंतर 'काय सांगता' हे न्यूज पोर्टल सुरु करण्यात आले आहे. या पोर्टलवरील प्रत्येक बातमी विश्वसनीय असते. करमाळा येथील बातम्यांसाठी अशोक मुरूमकर संपर्क : ९९२३१७५०२४ कार्यालय पत्ता : डॉ. बाबासाहेब आंबेडकर शॉपिंग सेंटर, गाळा नं. ४७, पेट्रोल पंपाजवळ, जुनी भाजी मंडई, वरचा मजला करमाळा, जि. सोलापूर- ४१३२०३. मेल आयडी : kaysangtaa.21@gmail.com जाहिरातीसाठी संपर्क : ९९२३१७५०२४

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *