मुंबई : शरद पवार हे आमचे श्रद्धास्थान आहे, असे म्हणत अजित पवार यांनी ‘ही वेळ का आली?’ याचे कारण सांगितले आहे. लोकांच्या विकासासाठी आपण निर्णय घेतला आहे. शरद पवार यांच्या छत्रछायेखाली मी तयार झालो, असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.
मुंबईत उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भवितव्य ठरवणारी अजित पवार यांच्या गटाची अतिशय महत्वाची बैठक झाली. या बैठकीला ३२ आमदार उपस्थित होते. या सभेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मांडलेले महत्वाचे मुद्दे…
- अजित पवार यांनी मांडला शरद पवार यांचा प्रवास
- सोनिया गांधी परदेशी आहेत हे पवारांनीच देशाला सांगितले होते.
- ३८ व्यावर्षी ‘पुलोद’ सरकार तयार केले होते.
- देशाला करिष्मा असलेले नेतृत्व हवे
- महाराष्ट्राचा विकास हे माझे स्वप्न
- राष्ट्रवादीला मुख्यमंत्रीपदाची संधी होती
- स्थगिती असलेली कामे सुरु होतील
- मी कधीही भेदभाव करत नाही
- मी सर्व जातीधर्माला बरोबर घेऊन विकासाला हातभार लावणार
- पुलोदमध्ये जनसंघही सहभागी होता
- पवारांच्या धोरणामुळे राष्ट्रवादीला मुख्यमंत्रीपद मिळाले नाही
- २०१७ ला काही वेगळे करण्याचा प्रयत्न सुरु होता
- २०१४ ला देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले तेव्हा राष्ट्रवादी बाहेरून पाठींबा देण्याचे जाहीर केले
- आम्ही तेव्हा वानखेडे स्टेडियमवर शपथविधीला गेलो
- भाजपबरोबर जायचे नव्हते तर आम्हाला का पाठवले
- २०१७ मध्येही वर्षावर बैठक झाली होती
- खाते वाटप, पालकमंत्री वाटप ठरले होते
- सुनील तटकरे, चंद्रकांत पाटील, सुधीर मुनगंटीवार यांच्यात दिल्लीतही बैठक झाली होती
- शिवसेना चालत नाही आम्हाला तेव्हा सांगितले आणि भाजपने शिवसेनेला सोडले नाही
- २०१९ मध्ये भाजपबरोबर जाण्यासाठी उद्योगपती यांच्या घरात बैठक झाली होती
- फडणवीस आणि आमच्यात बैठक झाली होती
- शेवटी आम्हाला शिवसेनबरोबर जायचे असे सांगण्यात आले
- शिवसेनेबरोबर जाण्याचा मग निर्णय का घेतला?
- उद्धव ठाकरे यांच्याबरोबर सरकार स्थापन केले
- शिवसेना मित्रपक्ष का झाला?
- शिवसेनेत अस्वस्था आहे हे वरिष्ठ नेत्यांना सूचना दिली होती
- राष्ट्रवादीच्या सर्व आमदारांनी सह्या करून सरकारमध्ये जाण्याचे पत्र दिले होते.
- प्रफुल पटेल, जयंत पाटील व माझी समिती स्थापन केली होती
- आम्हाला बडोदाला बोलावले होते. फोनवर चर्चा केली नाही
- तोपर्यंत शिंदेंचा शपथविधी झालेला नव्हता
- आम्ही कोणाच्या पोटी जन्माला आलो हे चूक झाली
- तूच वय झाले आहे? तुम्ही आशीर्वाद द्या, तुम्ही थांबले पाहिजे
- हे कोणासाठी सुरु आहे, असे म्हणत शरद पवार यांना टोला
- शिंदे गट फुटण्याच्यावेळी पत्र दिले होते
- आमच्यात सरकार चालवण्याची धमक नाही का
- राज्यातील प्रमुख नेत्यात माझेही नाव येथे
- मला लोकांसमोर व्हिलन केले जाते
- मी सुप्रियाशीही बोललो, तू काहीतरी सांग असे सांगितले होते
- राजीनामा दिल्यानंतर सुप्रियाला अध्यक्ष करण्याचे सांगितले होते
- 5 वेळा उपमुख्यमंत्री झालो हे रेकॉर्ड झाले, मलाही वाटते मुख्यमंत्री व्हावे
- येणाऱ्या निवडणुकीत सर्वाधिक जागा मिळवणार
- माझ्या दैवताला विंनती आहे. विठ्ठलाने, पांडुरंगाने आशीर्वाद द्यावा
- मलाही सभेतून उत्तर द्यावे लागेल
- केंद्र सरकार राज्याच्या विचाराचे असले तर मंजूरी मिळते, निधीही मिळतो
- साखर कारखाने अडचणीत आहेत. त्याला निधी मिळवायचा आहे
- शेतीचे प्रश्न आहेत ते सोडवायचे आहेत
- माझ्या वारिष्ठांनी आता आराम करावा. तुमच्या सभा झाल्या तर मलाही सभा घ्याव्या लागतील, असे म्हणत शरद पवार यांना इशारा
- कार्यकर्त्याना कधीही वाऱ्यावर सोडणार नाही
- चुकले तर कानाला धरा, पण कुठे तरी आता थांबले पाहिजे
- मी कोणाचाही अपमान केला नाही
- माझ्यावर अनेकदा गुगली टाकली, पण कोणाला त्रास दिला नाही
- मी थेट बोलणारा कार्यकर्ता आहे
- राजकारणात अनेक गोष्टी सहन केल्या
- 2024 ला 71 पेक्षा जास्त जागा जिंकू
- आपल्याच घरतील व्यक्तीची बदनामी का करता
- महामंडळ आपल्याला मिळणार आहे
- आपल्या जिल्ह्यात- भागात जाऊन काम करा
- चिन्ह आणि पक्ष आपल्याला मिळणार आहे
- मी साष्टांग नमस्कार करून सांगतो, तुम्ही आशीर्वाद द्या
- ठाण्याचा पट्ट्या म्हणत जितेंद्र आव्हाड यांच्यावरही टीका
- एकाने चार आमदार निवडून आणले पाहिजेत, पण ठण्यातून अनेकजण सोडून गेले
- मी शपथ घेतल्यापासून अनेकांनी शुभेच्या दिल्या
- सर्व जाती धर्मातील लोकांना बरोबर घेऊन काम करेन