करमाळा (सोलापूर) : पद्म पंडित प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष अण्णासाहेब पवार यांच्या वतीने 275 विद्यार्थ्यांना स्कूल बॅग व पाण्याची बॉटल देण्यात आली. तहसीलदार शिल्पा ठोकडे व निमगाव टे. चे सरपंच यशवंत शिंदे यांच्या हस्ते जिल्हा परिषद शाळा पवार वस्ती, जिल्हा परिषद शाळा सातोली, जिल्हा परिषद शाळा पन्हाळकर वस्ती व जिल्हा परिषद शाळा वडशिवने येथील विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाला सरपंच, उपसरपंच, सोसायटीचे चेअरमन, व्हाईस चेअरमन, ग्रामपंचायत सदस्य, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व पालक उपस्थित होते.
तहसीलदार ठोकडे यांच्या हस्ते शालेय साहित्य वाटप
