Sangharsh Mahila Gram Sangh office inaugurated at Shelgaon Kशेलगाव क : येथे संघर्ष महिला ग्रामसंघाच्या कार्यालयाचे उद्घाटन करताना योगेश जगताप व उपस्थित महिला व मान्यवर.

करमाळा (सोलापूर) : शेलगाव क येथे उमेदअंतर्गत (महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान) संघर्ष महिला ग्रामसंघाच्या कार्यालयाचे उद्घाटन तालुका अभियान व्यवस्थापक योगेश जगताप यांच्या हस्ते झाले. यावेळी प्रभाग समन्वयक आकाश पवार, प्रभाग संघ व्यवस्थापक शंकर येवले, हनुमंत पवार, माजी सरपंच अशोक काटुळे, उपसरपंच लखन ढावरे, सचिन वीर, ग्रामसेवक श्री. खाडे, ग्रामसंघाचे सचिव प्रियंका ढावरे, सीआरपी कविता वीर उपस्थित होते.

महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत शेलगाव क येथे 21 बचत गट कार्यरत आहेत. येथील ग्रामसंघाची स्थापना जून 2018 मध्ये झाली होती. या संघासाठी ग्रामपंचायतीने समाज मंदिराची इमारत उपलब्ध करून दिली. त्यासाठी आवश्यक असलेल्या सोयी सुविधा शेलगाव क येथील राजश्री शाहू शेतकरी बचत गटाने उपलब्ध करून दिल्या आहेत. या कार्यालयासाठी श्री छत्रपती शिवाजी महाराज, राजमाता जिजाऊ, सावित्रीबाई फुले, महात्मा फुले, राजश्री शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आदी महापुरुषांच्या प्रतिमा सरपंच आत्माराम वीर, उपसरपंच लखन ढावरे, माजी उपसरपंच सचिन वीर, नागेश ढावरे यांनी भेट दिल्या आहेत.

सरकारकडून महिला बचत गट व ग्रामसंघासाठी विविध योजना राबविल्या जात असून त्यांना सोलापूरला मोफत प्रशिक्षण दिले जाते. त्याचा लाभ महिलांनी घ्यावा. गटाचे व ग्राम संघाचे रेकॉर्ड अद्यावत ठेवावे. बचत गटाला, ग्रामसंघाला उद्योग उभा करण्यासाठी शासकीय पातळीवर मोठ्या प्रमाणावर अनुदान उपलब्ध करून दिले जात आहे. कर्ज पुरवठाही केला जात आहे. वांगी जिल्हा परिषद गटांमध्ये केळी पिकावरती प्रक्रिया करणारी महिलांची कंपनी बचत गटाच्या माध्यमातून उभी राहत आहे. भविष्य काळात अशा अनेक कंपन्या या गटांच्या माध्यमातून उभा राहतील, असे मत तालुका अभियान व्यवस्थापक जगताप यांनी व्यक्त केले .

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आमदार संजयमामा शिंदे यांचे स्वीय सहाय्यक डॉ. विकास वीर यांनी केले. मंगल शिंदे, राणी शिंदे, कांताबाई जाधव, सुवर्णा जाधव, सविता काटुळे, ज्योती वीर, मंगल काळे, अनुराधा ढावरे, कोमल वीर, कविता वीर, सारिका वीर, राणी वीर, अश्विनी वीर, कोमल माने, वर्षा माने, सविता सपाटे, उषा सपाटे, सुनीता माने, आकांक्षा माने, त्रिषला वीर, आशा वीर, सचिता वीर, जयश्री शिंदे, रूपा बनसोडे, कल्पना वीर, निर्मला वीर आदी महिला उपस्थित होत्या.

By kaysangtaa.21

पुणे, मुंबई, पिंपरी चिंचवड, सोलापूर व नगर येथे ‘पुढारी’, ‘प्रभात’ व ‘सकाळ’मध्ये बातमीदार व उपसंपादक म्हणून काम करत पत्रकारितेचा अनुभव घेतल्यानंतर 'काय सांगता' हे न्यूज पोर्टल सुरु करण्यात आले आहे. या पोर्टलवरील प्रत्येक बातमी विश्वसनीय असते. करमाळा येथील बातम्यांसाठी अशोक मुरूमकर संपर्क : ९९२३१७५०२४ कार्यालय पत्ता : डॉ. बाबासाहेब आंबेडकर शॉपिंग सेंटर, गाळा नं. ४७, पेट्रोल पंपाजवळ, जुनी भाजी मंडई, वरचा मजला करमाळा, जि. सोलापूर- ४१३२०३. मेल आयडी : kaysangtaa.21@gmail.com जाहिरातीसाठी संपर्क : ९९२३१७५०२४

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *