करमाळा (सोलापूर) : तालुक्यातील चिखलठाण येथील यात्रेदिवशी बंदोबस्तात असलेल्या पोलिसांबरोबर झालेल्या गैरवर्तन व हाणमार केल्याच्या आरोपावरून दाखल झालेल्या गुन्ह्यात अटक केलेल्या संशयित आरोपीस बार्शी येथील जिल्हा व सत्र न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे.
चिखलठाण येथे यात्रे दिवशी ड्युटीवर असलेल्या पोलिसांसोबत भांडण केल्याबाबत युवराज गलांडे यास शासकीय कामात अडथळा केल्याबाबत कलम 353 गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली होती. त्याला न्यायालयाने पंचवीस हजाराच्या जमिनीवर जामीन मंजूर केला आहे. यामध्ये ऍड. एन. टी. पाटील व ऍड. अमर शिंगाडे यांनी काम पाहिले.