If you go with the BJP the future is over Issues in Sharad Pawar speechIf you go with the BJP the future is over Issues in Sharad Pawar speech

मुंबई : अजित पवार यांनी शरद पवार यांच्याविरुद्ध अजित पवार यांनी बंडाचे निशाणा फडकवल्यानंतर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या उपस्थितीत यशवंतराव चव्हाण सेंटर येथे शरद पवार गटाचे आमदार, खासदार व पदाधिकारी यांची बैठक झाली. या बैठकीला १६ आमदार उपस्थित होते. अमोल कोल्हे, सुप्रिया सुळे, एकनाथ खडसे, जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड, मकरंद पाटील, राहुल भुसार, प्राजक्त तनपुरे, रोहित पवार, बाळासाहेब पाटील, चेतन तुपे, क्षीरसागार आदी उपस्थित आहेत. या बैठकीत पवार यांच्या भाषणातील मुद्दे…

 • शरद पवार यांनी राष्ट्रवादीचा २४ वर्षांपूर्वी जन्म कसा झाला हे सांगितले
 • राष्ट्रवादीत अनेकजण मंत्री, आमदार, खासदार झाले
 • सामान्य कुटुंबातील कार्यकर्ताही राज्य कसा चालवू शकतो हे दाखवून दिले
 • आज आपल्याला संकटातून पुढे जायचे आहे
 • मनमोहनसिंग यांच्याबरोबरही राष्ट्रवादीने काम केले
 • लोकशाहीमध्ये विरोधक यांच्यात सुसंवाद हवा
 • एखादा निर्णय घेतल्यानंतर त्यांचा काय परिणाम होईल याचा विचार करावा लागतो
 • आम्ही सर्वजण सत्तेत नाही, लोकांमध्ये आहोत
 • महाराष्ट्राचा चेहरा मोहरा बदलणार हेच आमचे धोरण
 • ज्याच्या हातात सत्ता आहे त्याच्याबादल विश्वास निर्माण झाला पाहिजे
 • देशात सवांद राहिला नाही
 • लोकशाही टिकवायची असेल तर संवाद महत्वाचा
 • फक्त आरोप करून चालणार नाही तर कृती केली पाहिजे
 • विरोधकांना एकत्र करण्याचे काम सुरु आहे
 • राष्ट्रवादी पक्ष हा भ्रष्ट आहे हे जर तुम्हाला वाटत असले तर ‘यांना’ बरोबर का घेतले? भाजपला प्रश्न
 • कार्यकर्त्याला विचारात न घेता वेगळा निर्णय घेणे हे योग्य नाही, अजित पवार यांना टोला
 • कार्यकर्त्यांनी पक्षाला चांगले दिवस आणले
 • ज्या विचारधारेचा विरोध केला, त्यांच्याबरोबर जाणे बरोबर नाही
 • लोकशाहीत पक्षाचा ताबा घेणे योग्य आहे का?
 • पक्षातील भूमिका राष्ट्रवादीच्या असतात
 • १९६७ साली माझी खून बैल जोडी होती, नंतर गाय वासरू चिन्ह झाले, आम्ही चरखा, नंतर पंजा (हात) असे चिन्ह आले
 • आम्ही घड्याळ जाऊ देणार नाही
 • चिन्ह हे सामान्य माणसाच्या अंतःकरणात लागते
 • मेळाव्यात माझा फोटो वापरत आहेत, त्यांना माहित आहे आपले नाणं चालणार नाही
 • पांडुरंगाच्या दर्शनासाठी पंढरपूरलाच जावे लागते
 • पांडुरंग म्हणायचं आणि दुर्लक्ष झालं सांगायचं, विठ्ठलाच्या दर्शनाला कुणीही थांबवू शकत नाही
 • वेगळा विदर्भ केल्याशिवाय हे करणार ते करणार नाही म्हणणारे आज उपमुख्यमंत्री आहेत, शरद पवारांचा फडणवीसांना नाव न घेता टोला
 • राष्ट्रवादीवर आरोप केले तर शपथ विधीला राष्ट्रवादीला का घेतलं, देशाचे नेते म्हणून बोलताना सभ्यता बाळगावी – शरद पवार
 • मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरही आपल्या सहकार्यांनी टीका केली
 • पुलोद सरकार बनवण्याचा निर्णय सर्वानी घेतला होता
 • नागालँडमध्ये परस्थिती वेगळी आहे, म्हणून बाहेरून पाठींबा दिला आहे
 • शिवसेना ही भाजपासून वेगळी झाली होती. बाळासाहेब ठाकरे यांनी इंदिरा गांधी यांना आणिबाणीच्यावेळी पाठींबा दिला होता
 • शिवसेनेचे हिंदुत्व हे अठरा पगड जातील घेऊन जाणारे आहे. मात्र भाजपचे हिंदुत्व तसे नाही
 • राज्याच्या एकोप्याला सुरुंग लावण्याची भाषा फडणवीस यांनी घेतली
 • देशात महागाई, रोजगार, शेतीचे प्रश्न आहेत
 • भाजपबरोबर गेले ते भविष्यात संपले
 • समाजात तेढ निर्माण करण्याचे काम भाजप करते
 • जे गेले त्यांची चिंता करू नका, आपण एकत्र आहोत. नवीन कर्तृत्वान नेतृत्व तयार करू

By kaysangtaa.21

पुणे, मुंबई, पिंपरी चिंचवड, सोलापूर व नगर येथे ‘पुढारी’, ‘प्रभात’ व ‘सकाळ’मध्ये बातमीदार व उपसंपादक म्हणून काम करत पत्रकारितेचा अनुभव घेतल्यानंतर 'काय सांगता' हे न्यूज पोर्टल सुरु करण्यात आले आहे. या पोर्टलवरील प्रत्येक बातमी विश्वसनीय असते. करमाळा येथील बातम्यांसाठी अशोक मुरूमकर संपर्क : ९९२३१७५०२४ कार्यालय पत्ता : डॉ. बाबासाहेब आंबेडकर शॉपिंग सेंटर, गाळा नं. ४७, पेट्रोल पंपाजवळ, जुनी भाजी मंडई, वरचा मजला करमाळा, जि. सोलापूर- ४१३२०३. मेल आयडी : kaysangtaa.21@gmail.com जाहिरातीसाठी संपर्क : ९९२३१७५०२४

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *