करमाळा (सोलापूर) : योगासने व प्राणायामशिवाय कोणतीच व्यक्ती जीवन व्यवस्थितपणे जगू शकत नाही. यासाठी योगासने महत्वाची आहेत. त्यातूनच २१ जून हा योग दिन म्हणून साजरा केला जातो. आज (शनिवार) आंतरराष्ट्रीय योग दिननिमित्त श्री रामचंद्र बहुउद्देशीय सामाजिक सेवाभावी संस्था संचालित स्नेहालय न्यू इंग्लिश स्कूलमध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आला. यावेळी योग शिक्षिका पाटील यांनी विद्यार्थ्यांना विविध योगासने तसेच प्राणायाम शिकवले. शाळेच्या मुख्याध्यापिका धनश्री दळवी यांच्यासह शिक्षक व विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. त्यामध्ये योगासने, प्राणायाम व व्यायाम प्रकार करून घेतले.
स्नेहालय न्यू इंग्लिश स्कूलमध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा
